CSK 5 खेळाडूंना डच्चू देणार, अय्यरपण होणार टीममधून आऊट, IPL लिलावाआधी प्लेअर्सची लिस्ट फुटली

Last Updated:

आयपीएल 2026 साठी सीएसके, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स सर्वाधिक खेळाडूंना डच्चू देणार आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत टीमना रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे.

CSK 5 खेळाडूंना डच्चू देणार, अय्यरपण होणार टीममधून आऊट, IPL लिलावाआधी प्लेअर्सची लिस्ट फुटली
CSK 5 खेळाडूंना डच्चू देणार, अय्यरपण होणार टीममधून आऊट, IPL लिलावाआधी प्लेअर्सची लिस्ट फुटली
मुंबई : आयपीएल 2026 साठीचा लिलाव 15 डिसेंबरच्या आसपास होण्याचं वृत्त आहे. यासाठी फ्रॅन्चायजींना 15 नोव्हेंबरच्या आत रिलीज करणाऱ्या खेळाडूंची यादी आयपीएल व्यवस्थापनाला द्यावी लागणार आहे. आयपीएल 2025 मध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या सीएसके, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स सर्वाधिक खेळाडूंना डच्चू देणार असल्याची बातमी समोर येत आहे. आयपीएल 2025 मध्ये सीएसके आणि राजस्थान शेवटच्या 2 क्रमांकावर राहिल्या होत्या.

सीएसके 5 खेळाडूंना देणार नारळ

एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्स तब्बल 5 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचं वृत्त क्रिकबझने दिलं आहे. यात दीपक हुड्डा, विजय शंकर, राहुल त्रिपाठी, सॅम करन आणि डेवॉन कॉनवे यांचा समावेश असू शकतो. आर.अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यामुळे सीएसकेच्या पर्समध्ये आधीच 9.75 कोटी रुपये जमा झाले आहेत.
advertisement

संजू राजस्थान सोडणार का?

दुसरीकडे संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सची साथ सोडणार का? याबाबतचा सस्पेन्स अजून कायम आहे. कुमार संगकारा पुन्हा एकदा राजस्थानचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे, त्यामुळे संगकारा संजूचा विचार बदलवू शकतो का? याबाबत चर्चा सुरू आहेत. वानिंदू हसरंगा आणि महीश तीक्षणा या दोन्ही स्पिनरबाबत राजस्थानकडून विचार सुरू आहे, पण हे दोघंही श्रीलंकन स्पिनर असल्यामुळे तसंच संगकाराही श्रीलंकेचा असल्यामुळे आता राजस्थान कुणाला रिलीज करणार? हे संगकारावरच अवलंबून असण्याची शक्यता आहे.
advertisement

दिल्ली दिग्गजांना सोडणार

आयपीएलच्या मागच्या मोसमात दिल्लीची कामगिरीही निराशाजनक झाली, त्यामुळे दिल्ली टी नटराजन, मिचेल स्टार्क, आकाश दीप, मयंक यादव आणि डेव्हिड मिलरची साथ सोडू शकते.

अय्यरलाही बाहेरचा रस्ता

केकेआरने आयपीएलच्या मागच्या मोसमात व्यंकटेश अय्यरला 23.75 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं, पण व्यंकटेश अय्यरने पूर्ण मोसमात संघर्ष केला, त्यामुळे केकेआरही व्यंकटेश अय्यरला बाहेरचा रस्ता दाखवू शकते.
advertisement

आरसीबी तिघांना सोडणार

2025 ची आयपीएल जिंकणारी आरसीबीही पुढच्या मोसमासाठी 3 खेळाडूंना बाहेर करण्याचा विचार करत आहे, ज्यात लियाम लिव्हिंगस्टोन, यश दयाळ आणि सुयश शर्मा यांचा समावेश आहे. यश दयाळवर महिला अत्याचाराचे आरोप झाले आहेत, त्यामुळे तो क्रिकेटपासून लांब आहे. तर लियाम लिव्हिंगस्टोन आणि सुयश शर्मा यांचीही कामगिरी मागच्या आयपीएलमध्ये खराब झाली होती.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
CSK 5 खेळाडूंना डच्चू देणार, अय्यरपण होणार टीममधून आऊट, IPL लिलावाआधी प्लेअर्सची लिस्ट फुटली
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement