Dhanteras Temples In India: भगवान धन्वंतरीची देशातील 5 प्रसिद्ध मंदिरे; धनत्रयोदशीला विशेष पूजा, आरोग्याचं वरदान

Last Updated:

Dhanteras Temples In India: धनत्रयोदशी सणाच्या दिवशी भगवान धन्वंतरिची विशेष पूजा-अर्चा केली जाते, निरोगी आरोग्याचे वरदान मागितले जाते. भगवान धन्वंतरिंची सर्वाधिक मंदिरे दक्षिण भारतात आहेत? धनत्रयोदशीच्या दिवशी येथे भक्त रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी येतात.

News18
News18
मुंबई : श्रीहरी विष्णूंचे रूप मानले गेलेले भगवान धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे जनक मानले जाते. समुद्रमंथनाच्या वेळी ते हातात अमृत कलश आणि जडीबुटी घेऊन प्रकट झाले होते, त्यामुळे ते रोगांपासून मुक्ती देणारे म्हणून ओळखले जातात. दक्षिण भारतात भगवान धन्वंतरिंना समर्पित अनेक मंदिरे आहेत, त्याविषयी जाणून घेऊ.
धनत्रयोदशी सणाच्या दिवशी भगवान धन्वंतरिची विशेष पूजा-अर्चा केली जाते, निरोगी आरोग्याचे वरदान मागितले जाते. भगवान धन्वंतरिंची सर्वाधिक मंदिरे दक्षिण भारतात आहेत? धनत्रयोदशीच्या दिवशी येथे भक्त रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी येतात.
तिरुमला येथील धन्वंतरी मंदिर - आंध्र प्रदेशातील तिरुमला येथे धन्वंतरी मंदिर आहे. येथे विशेष पूजा-अर्चा केल्याने आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि धन-धान्याचा आशीर्वादही मिळतो, अशी मान्यता आहे. येथे दरवर्षी पुजारी धन्वंतरि होमम करतात. हे होमम संपूर्ण देशाच्या कल्याणासाठी आणि महामारीपासून बचावासाठी केले जाते.
advertisement
श्री धन्वंतरी आरोग्य पीठम मंदिर - तमिळनाडूतील चेन्नई येथे प्राचीन श्री धन्वंतरी आरोग्य पीठम मंदिर आहे, तिथं आयुर्वेदिक पूजेला खूप महत्त्व आहे. दूरदूरचे भक्त येथे येऊन आपल्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी भगवान धन्वंतरिंना जडीबुटी अर्पण करतात. धनत्रयोदशीच्या निमित्ताने येथे मंदिरात खास पूजा ठेवली जाते आणि मंदिर फुलांनी सजवले जाते.
त्रिशूर धन्वंतरि मंदिर - केरळच्या वैद्यनाथपूर जिल्ह्यातील त्रिशूर येथेही भगवान धन्वंतरिंचे एक अनोखे मंदिर आहे. हे मंदिर त्याच्या पारंपरिक आयुर्वेदिक वारसासाठी ओळखले जाते.
advertisement
धनत्रयोदशीच्या दिवशी मंदिरात बसून पूजा आणि जप केल्यास सर्व रोगांपासून मुक्ती मिळते आणि भक्ताला दीर्घायुष्य प्राप्त होते, असे मानले जाते. येथे भगवान धन्वंतरिंना खास करून तूप आणि तुळशीची पाने अर्पण केली जातात आणि ती प्रसाद म्हणून खाल्ली जातात. येथे मुक्कुडी नावाचा खास प्रसाद तयार केला जातो.
advertisement
थोट्टुवा धन्वंतरि मंदिर - केरळच्या थोट्टुवा येथेही भगवान धन्वंतरिंचे मंदिर आहे. या मंदिरात स्वतः भगवान धन्वंतरि विराजमान आहेत आणि येथे केलेली पूजा फलदायी ठरते, अशी मान्यता आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने येथे मोठ्या रांगा लागतात. नैसर्गिक वस्तू अर्पण केल्या जातात.
रंगनाथस्वामी मंदिर - तमिळनाडूतील रंगनाथस्वामी मंदिर हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे मंदिर आहे, परंतु धनत्रयोदशीच्या दिवशी येथे धन्वंतरि देवाची विशेष पूजा-अर्चा केली जाते आणि जडीबुटींपासून बनवलेला प्रसाद अर्पण केला जातो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Dhanteras Temples In India: भगवान धन्वंतरीची देशातील 5 प्रसिद्ध मंदिरे; धनत्रयोदशीला विशेष पूजा, आरोग्याचं वरदान
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement