VIDEO : तीन दिवसांनी पृथ्वीचं डोकं ठिकाणावर,'माफ कर मला, मी तुझ्या मोठ्या भावासारखा',मुशीरची मागितली माफी
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पृथ्वी शॉला अखरे उपरती आली आहे. पृथ्वी शॉने आता मुशीर खानची माफी मागितल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
Prithvi Shaw vs Musheer Khan : टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉने सराव सामन्यात सरफराज खानचा भाऊ मुशीर खान कॉलर पकडून बॅटने मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पृथ्वी शॉला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. या टीकनंतर पृथ्वी शॉला अखरे उपरती आली आहे. पृथ्वी शॉने आता मुशीर खानची माफी मागितल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉने युवा खेळाड मुशीर खानची माफी मागितली आहे.यासोबत मी तुझ्यासाठी तु्झ्या मोठ्या भावासारखा आहे,असे सांगत त्याची समजूत काढली आहे,असे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
Competition can spark emotions, but character restores balance. After a small on-field exchange, Prithvi Shaw and Musheer Khan shared smiles and words post-match - that’s the spirit of the game! They remind us that the game may test tempers, but friendship wins in the end.#mca… pic.twitter.com/8E979mIOUI
— Maharashtra Cricket Association (@MahaCricket) October 10, 2025
advertisement
यासोबत सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पृथ्वीने वाद मिटवण्यासाठी पुढाकारही घेतला होता. अर्शिन कुलकर्णीला बाद केल्यानंतर सलामीवीर पृथ्वी शॉ मुशीरकडे गेला.यावेळी त्याने त्यांच्या खांद्यावर हात ठेवत मैत्रीपूर्ण गप्पा मारल्या.यावर मुशीरने उबदार प्रतिसाद दिला. त्याने शॉच्या कमरेवर हात ठेवून दोघांनी हलक्याफुलक्या क्षणी मतभेद मिटल्याचे संकेत दिले.
घटनेची होणार चौकशी
दिलीप वेंगसरकर शॉ-मुशीर घटनेची चौकशी करणार यापूर्वी, मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसरकर यांची चौकशीसाठी नियुक्ती केली. दरम्यान या घटनेची चौकशी गूरूवारी पार पडली आहे.या बैठकीत मुंबईचा कर्णधार आणि खेळाडूंकडून घटनेबाबत विचारण्यात आले आहे. यानंतर एक अहवाल तयार करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
advertisement
नेमका राडा काय झाला?
मुंबई आणि महाराष्ट्र संघात खेळवल्या गेलेल्या सराव सामन्यात ही घटना घडली.या घटनेत पृथ्वी शॉने शानदार फलंदाजी केली होती.मुंबई विरूद्ध खेळताना पृथ्वी शॉने 181 धावांची शानदार खेळी केली होती.या दरम्यान मुशीर खानने त्याला बाद केले होते. मुशीर खानने त्याला बाद करताचा हात जोडून 'थँक यू' अशा शब्दात निरोप दिला होता. हा निरोप कदाचित पृथ्वी शॉला आवडला नाही आणि त्याने मुशीर खानची कॉलर पकडण्याचा आणि त्याला बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा राडा झाला होता.
advertisement
भारतीय संघाबाहेरील फलंदाज पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चर्चेत आला, यावेळी मैदानावर आणि मैदानाबाहेरील कारणांमुळे. उजव्या हाताच्या फलंदाजाने रणजी हंगामापूर्वी झालेल्या सराव सामन्यात त्याच्या माजी स्थानिक संघ मुंबईविरुद्ध १८१ धावांची शानदार खेळी केली, परंतु त्याच्याशी संबंधित एका नवीन वादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर १८१ धावांवर बाद झाल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजाने मुंबईच्या खेळाडूंशी जोरदार बाचाबाची केली.
advertisement
मुशीर खान, ज्याने त्याच्यावर मात केली, त्याने विकेटनंतर त्याला निरोप दिला, ज्यामुळे तो वादाच्या वेळी त्याच्यावर हल्ला करत होता, तो नाराज झाला. शॉ आणि मुंबईच्या खेळाडूंमध्ये वाद खूप वाढला कारण पंचांना हस्तक्षेप करावा लागला आणि त्याला शांत करावे लागले, जरी मुंबईचा खेळाडू सिद्धेश लाड पॅव्हेलियनमध्ये परतत असताना फलंदाजाच्या मागे लागला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2025 4:33 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : तीन दिवसांनी पृथ्वीचं डोकं ठिकाणावर,'माफ कर मला, मी तुझ्या मोठ्या भावासारखा',मुशीरची मागितली माफी