Rishabh Pant : निदर्यी जोफ्रा आर्चरकडून फ्रँचर अंगठ्यावर बॉलिंगचा मारा, पंतने पुढच्या बॉलवर दाखवली 'जागा', पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rishabh Pant Playing With Fractured Video : इंग्लंडचा स्टार बॉलर जोफ्रा आर्चर याने ऋषभच्या पायावर एक यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला पण ऋषभने यशस्वीपणे बॉल खेळला. पण पुढच्याच बॉलवर ऋषभने आर्चरला जागा दाखवली.
Jofra Archer Targets Rishabh Pant Fractured Toes : इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी मॅचमध्ये (IND vs ENG 4th Test) टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत याने फ्रॅक्चर झालेल्या पायासह मैदानात आला अन् सर्वांची मनं जिंकली. मात्र, इंग्लंडने निर्दयीपणा दाखवल्याचं समोर आलं आहे. पहिल्या दिवशी फलंदाजी करत असताना ऋषभ पंतच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं. ख्रिस वोक्सच्या एका बॉलवर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करताना बॉल त्याच्या उजव्या पायाच्या बोटाला लागला. या दुखापतीमुळे त्याला प्रचंड वेदना होत होत्या आणि त्याला तात्काळ मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्यानंतर त्याच्या पायाला फ्रॅक्चर (Rishabh Pant Playing With Fractured) झाल्याचं पहायला मिळालं आहे.
आर्चरला जागा दाखवली
मोठं धाडस दाखवत ऋषभ पंत फ्रॅक्चर असताना देखील मैदानात उतरला. टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात येईल, असं दिसत असताना ऋषभ लंगडत का होईना मैदानात आला अन् 27 बॉल फेस केले. यावेळी इंग्लंडच्या खेळाडूंनी निर्दयीपणे त्याच्या फ्रॅक्चर पायावर बॉलने मारा केला. इंग्लंडचा स्टार बॉलर जोफ्रा आर्चर याने ऋषभच्या पायावर एक यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला पण ऋषभने यशस्वीपणे बॉल खेळला. पण पुढच्याच बॉलवर ऋषभने आर्चरला जागा दाखवली.
advertisement
आर्चरला खणखणीत सिक्स
आर्चरने जेव्हा पुढचा बॉल टाकला तेव्हा ऋषभने गॅप काढला अन् आर्चरला खणखणीत सिक्स मारला. आडव्या पट्टीत घेऊन आर्चरला सिक्स मारल्याने प्रेक्षकांनी एकच कल्ला केला. ऋषभ पंतने 75 बॉलमध्ये 54 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 3 फोर आणि 2 सिक्स मारले.
पाहा Video
Rishabh-Panti Max!
They tried to hit him where it hurts... Pant responds by hitting it out of the park!
Toughness has a new name @RishabhPant17 #ENGvIND 4th TEST, DAY 2 | LIVE NOW on JioHotstar https://t.co/Y3btplYguV pic.twitter.com/6a2zPCQsr5
— Star Sports (@StarSportsIndia) July 24, 2025
advertisement
वोक्सचा बॉल लागल्यानंतर पंतला तातडीने स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे त्याच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी त्याला किमान सिक्स आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे, ज्यामुळे तो या मालिकेतील पुढील मॅच खेळू शकणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 25, 2025 8:08 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rishabh Pant : निदर्यी जोफ्रा आर्चरकडून फ्रँचर अंगठ्यावर बॉलिंगचा मारा, पंतने पुढच्या बॉलवर दाखवली 'जागा', पाहा Video


