साखरपुड्यानंतर अर्जुनचं 'लेडी लक' जोरात, कमबॅकच्या मॅचमध्येच केला धमाका, बॉलिंग पाहून सचिनही खूश!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने सात महिन्यांनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. यानंतर पहिल्याच सामन्यात अर्जुन तेंडुलकरने धमाका केला आहे.
मुंबई : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने सात महिन्यांनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. दीर्घ कालावधीनंतर मैदानावर परतलेल्या या अर्जुनने त्याच्या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. इतकेच नाही तर त्याने या सामन्यात हंगामातील पहिल्याच पाच विकेटही मिळवल्या. अलीकडेच अर्जुनचा सानिया चांडोकसोबत साखरपुडा पार पडला. अर्जुनच्या आयुष्यात आलेल्या लेडी लकमुळे क्रिकेटच्या मैदानातही त्याचं नशीब फळफळल्याचं दिसून येत आहे.
साखरपुड्यानंतर बदललं अर्जुनचं नशीब
अर्जुन तेंडुलकर कर्नाटकातील प्रसिद्ध डॉक्टर केटी मेमोरियल स्पर्धेत गोव्याकडून खेळत आहे. अर्जुनने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत हा क्षण शेअर केला. आपल्यासाठी हे पुनरागमन खूपच खास असल्याचं अर्जुन म्हणाला आहे.
सानिया ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे, ज्यांचे कुटुंब हॉटेल आणि फुड हॉस्पिटॅलिटी क्षेत्राशी संबंधित आहे. इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी या संस्था त्यांच्या मालकीच्या आहेत. अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा समारंभ अत्यंत खासगी ठेवण्यात आला होता, ज्यात दोन्ही कुटुंबातल्या जवळच्या व्यक्तींनाच आमंत्रित करण्यात आलं होतं.
advertisement
अर्जुनचा करिअरमध्ये संघर्ष
25 वर्षांच्या अर्जुनचं क्रिकेट करिअर अजूनही आकार घेत आहे. डावखुरा फास्ट बॉलर असलेला अर्जुन खालच्या फळीमध्ये बॅटिंगही करतो. अर्जुनने 2020-21 च्या मोसमात मुंबईकडून आपल्या देशांतर्गत क्रिकेट करिअरची सुरूवात केली, पण मुंबईकडून संधी मिळत नसल्यामुळे तो गोव्याला गेला. जिथून त्याला लिस्ट ए आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. आयपीएल 2023 मध्ये अर्जुनने मुंबई इंडियन्सकडून केकेआरविरुद्धच्या सामन्यातून आयपीएल पदार्पण केलं.
advertisement
अर्जुनच्या नावावर शतक
अर्जुनने 17 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 37 विकेट घेतल्या आहेत, तसंच त्याच्या नावावर एक शतक आणि दोन अर्धशतकंही आहेत. लिस्ट ए मध्ये अर्जुन 18 आणि आयपीएलमध्ये 5 सामने खेळला आहे, ज्यात त्याला 3 विकेट मिळाला. अर्जुनच्या क्रिकेट करिअरमधील सुरूवातीचे आकडे फारसे प्रभावी नसले, तरी त्याचं करिअर हळूहळू आकार घेत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 8:58 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
साखरपुड्यानंतर अर्जुनचं 'लेडी लक' जोरात, कमबॅकच्या मॅचमध्येच केला धमाका, बॉलिंग पाहून सचिनही खूश!