14 तारखेला पाकिस्तानविरुद्ध सामना, 13 ला रोहितची अग्निपरीक्षा, टीम इंडियात वेगवान घडामोडी
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 सप्टेंबरला मुकाबला होणार आहे, पण त्याआधी 13 सप्टेंबरला भारताच्या वनडे टीमचा कर्णधार रोहित शर्मा याला अग्निपरिक्षेला सामोरं जावं लागणार आहे.
मुंबई : आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 सप्टेंबरला मुकाबला होणार आहे, पण त्याआधी 13 सप्टेंबरला भारताच्या वनडे टीमचा कर्णधार रोहित शर्मा याला अग्निपरिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. 13 सप्टेंबरला बंगळुरूमध्ये रोहित शर्माची ब्रॉन्को टेस्ट होणार आहे. या टेस्टमधून रोहितला त्याचा फिटनेस, मानसिक कणखरपणा आणि खेळाच्या नव्या आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे.
खेळाडूची कंडिशनिंग, स्टॅमिना, तंत्र, फिटनेस या गोष्टी तपासण्यासाठी ब्रॉन्को टेस्ट घेतली झाले. टीम इंडियाच्या इतिहासात पहिल्यांदाच खेळाडूंची अशाप्रकारची टेस्ट घेतली जाणार आहे. ब्रॉन्को टेस्टवरच रोहितचं वनडे क्रिकेटमधलं भवितव्य ठरणार का? अशा चर्चाही भारतीय क्रिकेटमध्ये आता सुरू झाल्या आहेत.
कशी होणार ब्रॉन्को टेस्ट?
ब्रॉन्को टेस्टमध्ये खेळाडूंना कोणत्याही ब्रेकशिवाय शटल रनिंग करावे लागते. रोहित सगळ्यात आधी 20 मीटर, 40 मीटर आणि शेवटी 60 मीटर शटल रन करेल, यादरम्यान त्याला कोणताही ब्रेक मिळणार नाही. ब्रॉन्को टेस्टच्या एका सेटमध्ये तीन रेस असतात, यात खेळाडूला असे पाच सेट करावे लागतात. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर खेळाडूला न थांबता 1200 मीटर धावावं लागतं. ब्रॉन्को टेस्टमध्ये पास होण्यासाठी खेळाडूला 6 मिनिटांमध्ये ही रेस पूर्ण करावी लागते. या चाचणीद्वारे खेळाडूची सहनशक्ती, त्याची शरीरयष्टी आणि वेगही तपासला जातो.
advertisement
रोहित शर्मा जून महिन्यात आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी शेवटचा सामना खेळला होता. तर भारताकडून रोहितचा शेवटचा सामना मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचा होता. काहीच दिवसांपूर्वी रोहितने मुंबईमध्ये टीम इंडियाचा माजी सहाय्यक प्रशिक्षक आणि त्याचा जुना मित्र अभिषेक नायर याच्यासोबत सराव सुरू केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजआधी मॅच प्रॅक्टिससाठी रोहित इंडिया ए कडून ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध खेळण्याची शक्यता आहे, पण 13 सप्टेंबरला रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार का नाही? याबाबतचा सस्पेन्स संपण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 29, 2025 9:06 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
14 तारखेला पाकिस्तानविरुद्ध सामना, 13 ला रोहितची अग्निपरीक्षा, टीम इंडियात वेगवान घडामोडी