IND vs NZ : मोहम्मद सिराजच्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ, न्यूझीलंडविरुद्धची वनडे सिरीज सुरू असताना अचानक मोठी घोषणा!

Last Updated:

Mohammed Siraj Hyderabad Ranji Trophy captain :मोहम्मद सिराज आता कॅप्टन्सीची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. रणजी ट्रॉफीच्या उर्वरित मॅचेससाठी त्याची हैदराबाद टीमच्या कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Mohammed Siraj Hyderabad Ranji Trophy captain
Mohammed Siraj Hyderabad Ranji Trophy captain
Mohammed Siraj Appointed captain : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे सीरिज सुरू असताना आता क्रिडाविश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. मोहम्मद सिराजच्या खांद्यावर कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात आलीये. टीम इंडियाचा वेगवान बॉलर मोहम्मद सिराज न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खास कामगिरी करताना दिसला नाही. अशातच आता त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मोहम्मद सिराज आता कॅप्टन्सीची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. रणजी ट्रॉफीच्या उर्वरित मॅचेससाठी त्याची हैदराबाद टीमच्या कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तिलक वर्मा हैदराबादचे नेतृत्व करत होता, मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० सीरिजमध्ये त्याची निवड झाल्याने आणि नुकत्याच झालेल्या एका सर्जरीमुळे तो या मॅचेससाठी उपलब्ध नाही.
हैदराबादचा संघ २२ आणि २९ जानेवारी रोजी आपल्या घरच्या मैदानावर मुंबई आणि छत्तीसगडविरुद्ध भिडणार आहे. सिराज २२ जानेवारीला मुंबईविरुद्ध कॅप्टन म्हणून आपल्या कारकिर्दीची पहिली मॅच खेळणार आहे. सिराजने नेहमीच देशासाठी खेळताना लढाऊ वृत्ती दाखवली असून, त्याच्या या अनुभवाचा फायदा हैदराबादच्या तरुण खेळाडूंना होईल, असा विश्वास निवड समितीने व्यक्त केला आहे.
advertisement
निवड समितीचे अध्यक्ष पी. हरी मोहन यांनी सिराजच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या निवडीसोबतच समितीने अमन राव पेराला याला देखील संघात स्थान दिले आहे, ज्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये नुकतेच डबल सेंच्युरी झळकावली होती.
हैदराबादची टीम: मोहम्मद सिराज (कॅप्टन), जी राहुल सिंह (उपकॅप्टन), सीवी मिलिंद, तनय त्यागराजन, के रोहित रायुडू, के हिमातेजा, ए वरुण गौड़, एम अभिरथ रेड्डी, राहुल रादेश (विकेटकीपर), अमन राव पेराला, सीटीएल रक्षण रेडी, एन नितिन साई यादव, कनाला नितेश रेड्डी, साई प्रगनय रेड्डी (विकेटकीपर) आणि बी पुन्नैया.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ : मोहम्मद सिराजच्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ, न्यूझीलंडविरुद्धची वनडे सिरीज सुरू असताना अचानक मोठी घोषणा!
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement