CSK ला वाऱ्यावर सोडून MS Dhoni रांचीला निघून गेला, लोकं म्हणाली 'आता कॅप्टन्सी कोण करणार?'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IPL 2025 MS Dhoni Leave CSK : चेन्नई सुपर किंग्जचा सुपरस्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी रांचीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. धोनी एका प्लेनमधून रांचीला जात असलेल्या फोटो समोर आलेत.
CSK IPL 2025 New Schedule : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आयपीएल 2025 तात्पुरती स्थगित करण्यात आल्याने हे दोन्ही सामने आता स्थगित झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच सुधारित वेळापत्रक आणि सामन्यांच्या ठिकाणांची घोषणा करेल. त्यामुळे, चेन्नई सुपर किंग्सच्या उर्वरित सामन्यांविषयी अधिकृत माहितीसाठी बीसीसीआयच्या पुढील घोषणेची प्रतिक्षा करावी लागेल. अशातच आता सीएसकेसाठी बॅड न्यूज समोर आलीये.
महेंद्रसिंग धोनी रांचीला रवाना?
चेन्नई सुपर किंग्जचा सुपरस्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी रांचीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. धोनी एका प्लेनमधून रांचीला जात असलेल्या फोटो समोर आले असताना आता चेन्नईच्या फॅन्सचं टेन्शन वाढलंय. धोनी आता सीएसकेला सोडून गेला की काय? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्जने याबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. सोशल मीडियावर मात्र त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
advertisement
MS DHONI ON THE WAY TO RANCHI...!!!
- Duty, Honour, Country. pic.twitter.com/ZUfU9iW3Nv
— Johns. (@CricCrazyJohns) May 11, 2025
चेन्नई सुपर किंग्सचे दोन सामने शिल्लक
आयपीएल 2025 तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मूळ वेळापत्रकानुसार, चेन्नई सुपर किंग्सचे पुढील दोन सामने शिल्लक होते. पहिला सामना 12 मे 2025 रोजी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध सायंकाळी 7.30 वाजता होणार होता, तर दुसरा सामना 18 मे 2025 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध दुपारी 3.30 वाजता नियोजित होता.
advertisement
उर्वरित सामने कधी?
दरम्यान, सीमेवरची परिस्थिती स्थिर राहिल्यास आणि सरकारने मान्यता दिल्यास, आयपीएल 15 किंवा 16 मे 2025 रोजी पुन्हा सुरू होऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आयपीएल 2025 आणि सीएसकेच्या उर्वरित सामन्यांच्या सुधारित वेळापत्रकासाठी तुम्हाला बीसीसीआयकडून अधिकृत घोषणा होण्याची वाट पहावी लागेल.
चेन्नईची आयपीएलमधील कामगिरी
advertisement
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने IPL २०२५ मध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे, लीग टेबलमध्ये ते १० व्या स्थानावर आहेत. त्यांनी खेळलेल्या १२ सामन्यांपैकी फक्त ३ मध्ये विजय मिळवण्यात त्यांना यश आले आहे, तर उर्वरित ९ सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यांचे गुणसंख्या फक्त ६ गुणांवर आहे, ज्यामध्ये -०.९९२ च्या लक्षणीयरीत्या नकारात्मक नेट रन रेट (NRR) मुळे वाढ झाली आहे, ज्यामुळे प्लेऑफसाठी पात्र होण्याच्या त्यांच्या आशा प्रभावीपणे धुळीस मिळाल्या आहेत.
Location :
Chennai,Tamil Nadu
First Published :
May 11, 2025 12:13 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
CSK ला वाऱ्यावर सोडून MS Dhoni रांचीला निघून गेला, लोकं म्हणाली 'आता कॅप्टन्सी कोण करणार?'