Blast In Cricket Ground : क्रिकेटच्या मैदानात अचानक झाला 'ब्लास्ट', 4 खेळाडू गंभीर जखमी, परिसरात दहशत

Last Updated:

बुधवारी क्रिकेटच्या मैदानावर अचानक एक रहस्यमयी स्फोट झाला. क्रिकेट खेळणारी किमान चार मुले या स्फोटात गंभीर जखमी झाली. जखमींची ओळख पटली आहे.

News18
News18
Blast In Cricket Ground : बुधवारी क्रिकेटच्या मैदानावर अचानक एक रहस्यमयी स्फोट झाला. क्रिकेट खेळणारी 10 ते 13 वयोगटातील किमान चार मुले या स्फोटात गंभीर जखमी झाली. बुधवारी दुपारी हंदवाडा येथील जिल्हा पोलिस लाईन (डीपीएल) जवळील तुतीगुंड गावात काही मुले एकत्र क्रिकेट खेळत असताना ही घटना घडली. जखमींची ओळख पटली आहे ती उजैर ताहिर, साजिद रशीद, हाजीम शब्बीर आणि झियान ताहिर अशी आहे, हे सर्व स्थानिक गावातील मुले आहेत.
पोलीस तपासात आढळलं 'स्टन शेल'
वृत्तानुसार, सर्व मुलांना गंभीर अवस्थेत जीएमसी हंदवाडा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रहस्यमयी स्फोटाची माहिती मिळताच, पोलिस आणि सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात घटनास्थळी एक स्टन शेल सापडल्याचे समोर आले आहे. कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणादरम्यान सुरक्षा दलांकडून हे शेल सामान्यतः वापरले जातात. मुलांचा एक गट मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळत असताना हा स्फोट झाला.
advertisement
परिसरात एकच खळबळ
स्फोटात जखमी झालेल्या चारही मुलांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसराला वेढा घातला आणि स्फोटाचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला. वृत्तानुसार, हा स्फोट जुन्या शेलमुळे झाला. स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ पसरली. क्रिकेट खेळणारी मुले जमिनीवर जखमी अवस्थेत आढळली. या संपूर्ण घटनेत अद्यापही स्फोट का झाला? याच कारण समजू शकलेलं नाही, तथापि, जुन्या शेलमुळे स्फोट घडला असल्याचं प्रथमदर्शनी सांगितलं जात आहे.
advertisement
घटनास्थळ सील करण्यात आले
गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व मुलांना रुग्णालयात दाखल केले. मुले ज्या मैदानावर क्रिकेट खेळत होती ते मैदान सील करण्यात आले आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, परिसरात सोडलेल्या जुन्या गोळ्यामुळे हा स्फोट झाल्याचा संशय आहे. स्फोटाचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सर्व मुले तुतीगुंड कुलंगम येथील रहिवासी आहेत. या घटनेचा पुढील तपास सध्या स्थानिक पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Blast In Cricket Ground : क्रिकेटच्या मैदानात अचानक झाला 'ब्लास्ट', 4 खेळाडू गंभीर जखमी, परिसरात दहशत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement