टीम इंडियाच्या बससमोर उभा राहिला पाकिस्तानी फॅन, बाहेर येऊन विराट-रोहितने काय केलं? Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर उतरल्यानंतर टीम इंडियाने लगेचच जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. माजी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार खेळाडू विराट कोहली यांनी नेटमध्ये जोरदार सराव केला.
पर्थ : 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सीरिजसाठी भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर उतरल्यानंतर टीमने लगेचच जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. माजी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार खेळाडू विराट कोहली यांनी नेटमध्ये जोरदार सराव केला, त्यावरून हे दोन्ही खेळाडू सीरिजसाठी सज्ज असल्याचं दिसत आहे. सात महिन्यांनंतर विराट आणि रोहित शर्माचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक झालं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये नेट प्रॅक्टिसआधी विराट कोहली आणि रोहित शर्माने असं काही केलं, ज्यामुळे पाकिस्तानी चाहता भलताच खूश झाला.
रोहित- विराटचं पाकिस्तानी फॅनला गिफ्ट
टीम इंडियाच्या प्रॅक्टिसआधी एका पाकिस्तानी चाहत्याला त्याचे दोन आवडते खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची ऑटोग्राफ मिळाली, त्यामुळे तो खूप आनंदी झाला. भारतीय टीम सरावासाठी हॉटेलमधून बाहेर पडली, तेव्हा हा चाहता टीम बसजवळ उभा होता. यादरम्यान त्याने आधी विराट कोहलीला आरसीबीच्या जर्सीवर ऑटोग्राफ द्यायची विनंती केली, यानंतर विराटने हसतमुखाने त्याची ही इच्छा पूर्ण केली.
advertisement
A lucky fan of Virat Kohli from Karachi got his RCB jersey signed by the star batter. @rohitjuglan @ThumsUpOfficial #ViratKohli #TeamIndia #AUSvsIND #CricketFans pic.twitter.com/gujRTYbwee
— RevSportz Global (@RevSportzGlobal) October 16, 2025
advertisement
रोहित शर्माने या पाकिस्तानी चाहत्याकडे असलेल्या भारतीय टीमच्या जर्सीवर ऑटोग्राफ केली. एकाच दिवशी या दोन महान खेळाडूंच्या ऑटोग्राफ मिळाल्यामुळे पाकिस्तानी चाहत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.
नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी मैदानात हस्तांदोलन केलं नाही, त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. फक्त खेळाडूच नाही तर दोन्ही बाजूंच्या चाहतेही सोशल मीडियावर एकमेकांसोबत भिडत होते. पण ऑस्ट्रेलियामध्ये मात्र वेगळंच घडलं. विराट आणि रोहितच्या या कृतीनंतर काही चाहत्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव असताना विराट आणि रोहितने असं करायला नको होतं, अशा प्रतिक्रिया काही जणांनी दिल्या आहेत. तर हा फॅन पाकिस्तानचा आहे हे विराट रोहितला माहिती नव्हतं, असंही काहींचं म्हणणं आहे.
advertisement
विराट-रोहितकडे लक्ष
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वनडे सीरिजदरम्यान चाहत्यांचं लक्ष विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याकडे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली पहिल्यांदाच मैदानात उतरत आहेत, पण आता रोहित शर्मा टीमचा कर्णधार नसेल. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय टीम खेळणार आहे. सीरिजचा पहिला सामना 19 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 10:46 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
टीम इंडियाच्या बससमोर उभा राहिला पाकिस्तानी फॅन, बाहेर येऊन विराट-रोहितने काय केलं? Video