Pakistan Cricket : फायनलमधील पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूंना 'जोर का झटका', PCB ने तडकाफडकी घेतला निर्णय

Last Updated:

PCB cancels NOC For Pakistani Players : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हणजे PCB ने परदेशी टी-ट्वेंटी लीगमध्ये सहभागी होणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) रद्द केलं आहे.

PCB cancels NOC For Pakistani Players
PCB cancels NOC For Pakistani Players
Pakistan Cricket Players NOC : आशिया कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला चारीमुंड्या चित केलं अन् पुन्हा एकदा आपलं वर्चस्व दाखवून दिलं आहे. सलग तिसऱ्यांदा भारताकडून पराभव स्विकारावा लागल्यानंतर पाकिस्तानला खाली मान घालावी लागतीये. अशातच आता पाकिस्तानने आशिया कपच्या पराभवानंतर मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाबर आझमसह इतर खेळाडूंना मोठा फटका बसला आहे.

पाकिस्तानी खेळाडूंना मोठा धक्का

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हणजे PCB ने परदेशी टी-ट्वेंटी लीगमध्ये सहभागी होणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) रद्द केलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचे खेळाडू परदेशी लीग खेळू शकणार नाहीत. त्यामुळे आता पाकिस्तानी खेळाडूंना मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. आशिया कप फायनलच्या एक दिवसानंतर बोर्डाने हा निर्णय घेतला. बोर्डाने या निर्णयाचे कारण दिलेलं नाही.
advertisement

एनओसी पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमैर अहमद सय्यद यांनी 29 सप्टेंबर रोजी एका सूचनेद्वारे खेळाडू आणि एजंटना या निर्णयाची माहिती दिली. लीग आणि इतर परदेशी स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना दिलेले सर्व एनओसी पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आले आहेत, असं पाकिस्तानी खेळाडूंना सांगण्यात आलं आहे. त्यामुळे बाबर आझमसह इतर खेळाडूंना मोठा फटका बसलाय, असं मानलं जातंय.
advertisement

बाबर आझम इतर खेळाडूंना फटका

पाकिस्तानच्या बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद रिझवान, फहीम अश्रफ आणि शादाब खान या खेळाडूंना विशेष: मोठा फटका बसेल. हे खेळाडू यावर्षी ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये सहभागी होणार होते. मात्र, त्यांना आता घरीच बसावं लागणार आहे. तर हॅरिस रौफ आणि इतर खेळाडूंना आयएलटी-20 लीगमध्ये खेळतातच. अशातच आता पाकिस्तानच्या निर्णयामुळे खेळाडूंच्या खिशाला देखील कात्री बसली आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Pakistan Cricket : फायनलमधील पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूंना 'जोर का झटका', PCB ने तडकाफडकी घेतला निर्णय
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement