Indore Crime : ऑस्ट्रेलियन खेळाडूनंतर आता पुण्याच्या महिला खेळाडूचा इंदौरमध्ये विनयभंग, रात्री 12 वाजता बसमध्ये काय घडलं?

Last Updated:

Pune National Shooter Woman Molested : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार 16 नोव्हेंबरच्या रात्री 12 च्या सुमारास 'वर्मा ट्रॅव्हल्स'च्या बसमध्ये घडला. ही घटना घडत असताना खेळाडूंनी विरोधही केला होता.

Pune National Shooter Woman Molested
Pune National Shooter Woman Molested
National Shooter Woman Molested In Indore : गेल्या काही दिवसांपासून देशातील गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. पुणे शहरातून भोपाळ येथे शूटिंग स्पर्धेसाठी गेलेल्या एका राष्ट्रीय नेमबाज महिला खेळाडूला प्रवासादरम्यान अत्यंत वाईट अनुभवातून जावं लागल्याची माहिती समोर आली आहे. स्लीपर कोच बसमधून प्रवास करत असताना बसमधील कर्मचाऱ्यांकडून त्यांचा विनयभंग झाल्याची ही गंभीर घटना आहे. या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

16 नोव्हेंबरच्या रात्री 12 च्या सुमारास काय घडलं?

हा संपूर्ण प्रकार भोपाळ आणि इंदूर दरम्यान घडला. प्रवासादरम्यान बसचालक आणि त्याचे दोन मदतनीस नशेत होते. याच मदतीनिशी तिघांनी खेळाडूला वाईट हेतूने स्पर्श केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार 16 नोव्हेंबरच्या रात्री 12 च्या सुमारास 'वर्मा ट्रॅव्हल्स'च्या बसमध्ये घडला. ही घटना घडत असताना खेळाडूंनी विरोधही केला होता.
advertisement

हिंमत करून चार वेळा त्रास दिला

या विवाहित खेळाडूने पोलिसांना सांगितले की, भोपाळमधील शूटिंग स्पर्धा संपल्यानंतर त्या पुण्याकडे परतत होत्या. आरोपींनी पहिल्यांदा त्यांना अयोग्यरीत्या स्पर्श केला तेव्हा त्यांनी मदतनीसाला स्पष्टपणे फटकारले होते. मात्र, बस भोपाळहून सुटल्यानंतर सुमारे अर्ध्या तासातच आरोपींनी हिंमत करून त्यांना चार वेळा त्रास दिला. या प्रवासादरम्यान रस्त्यात कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही.
advertisement

मदतनीसाला लाथाबुक्क्या मारलं

बस इंदूरला पोहोचल्यानंतर, एका थांब्यावर पोलिसांची तपासणी सुरू असल्याचे दिसताच या खेळाडूने हिंमत दाखवली. त्यांनी तात्काळ मदतनीसाला लाथाबुक्क्या मारण्यास सुरुवात केली. दुसरा मदतनीस मदतीला धावून आल्यावर त्यालाही जोरदार मारहाण केली.

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा विनयभंग

या गोंधळानंतर बसचालक आणि दोन्ही मदतनीस घटनास्थळावरून पळून गेले, मात्र पोलिसांनी नंतर त्यांना पकडले. विशेष म्हणजे, 26 ऑक्टोबर रोजी याच इंदूर शहरात दोन ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंचा विनयभंग केल्याची घटनाही समोर आली होती.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Indore Crime : ऑस्ट्रेलियन खेळाडूनंतर आता पुण्याच्या महिला खेळाडूचा इंदौरमध्ये विनयभंग, रात्री 12 वाजता बसमध्ये काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement