Ranji Trophy : अर्जुनच्या 359 धावा,पृथ्वीचीही बॅट तळपली, रणजीत सर्वाधिक धावा करणारे सहा बॅटसमन कोण?

Last Updated:

रणजी ट्रॉफी 2025-26 च्या हंगामाला सूरूवात झाली आहे.या हंगामातील दोन सामने आधीच पार पडले आहेत. या दोन सामन्यात अनेक खेळाडूंनी जबरदस्त खेळी केली आहे.

ranji trophy 2025 26
ranji trophy 2025 26
Ranji Trophy 2025-26 : रणजी ट्रॉफी 2025-26 च्या हंगामाला सूरूवात झाली आहे.या हंगामातील दोन सामने आधीच पार पडले आहेत. या दोन सामन्यात अनेक खेळाडूंनी जबरदस्त खेळी केली आहे. या जबरदस्त खेळीच्या बळावर या खेळाडूंनी आतापर्यंतच्या दोन सामन्यात सर्वाधिक धावा केल्या आहेत.त्यामुळे दोन सामन्यात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू नेमके कोण आहेत? या खेळाडूंनी किती धावा केल्या आहेत? हे जाणून घेऊयात.
रणजी ट्रॉफी हंगामातील दोन सामन्यांमध्ये धावांच्या बाबतीत अव्वल सहा फलंदाजांबद्दल चर्चा करूयात. पहिल्या क्रमांकावर अमन मोखाडे आहे.विदर्भाचा फलंदाज अमन मोखाडे या हंगामातील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याने 179.50 च्या प्रभावी सरासरीने 359 धावा केल्या आहेत,ज्यात दोन शतकांचा समावेश आहे.
चंदीगडकडून खेळणाऱ्या अर्जुन आझादने देखील पहिल्या दोन सामन्यांमध्ये 359 धावा केल्या आहेत.परंतु त्याने दोन सामन्यांमध्ये चार डावांमध्ये या धावा केल्या आहेत, तर अमनने दोन सामन्यांमध्ये फक्त दोन डावांमध्ये तितक्याच धावा केल्या आहेत आणि अव्वल स्थान मिळवले आहे अर्जुनने दोन सामन्यांमध्ये दोन शतकेही केली आहेत आणि त्याची सरासरी 89.75 आहे.
advertisement
या यादीत तिसऱ्या स्थानावर दिल्लीचा फलंदाज आयुष दोसेजा आहे, ज्याने दोन सामन्यांमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 348 धावा केल्या आहेत, तर त्याची सरासरी 174 आहे.चौथ्या स्थानावर दिल्लीचा फलंदाज सनत सांगवान आहे.ज्याने दोन सामन्यांमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 347 धावा केल्या आहेत.
पाचव्या स्थानावर सिक्कीमचा फलंदाज गुरिंदर सिंग आहे.ज्याने दोन सामन्यांमध्ये दोन शतके आणि एका अर्धशतकासह 340 धावा केल्या आहेत.या यादीत सहाव्या स्थानावर महाराष्ट्राचा सलामीवीर पृथ्वी शॉ आहे. ज्याने दोन सामन्यांमध्ये एक शतक आणि एका अर्धशतकासह ३०५ धावा केल्या आहेत, त्याची सर्वोत्तम धावसंख्या 222 आहे.
advertisement
दरम्यान रणजीच्या या हंगामात टीम इंडियाकडून खेळणाऱ्या व सध्या संघाचा भाग नसलेल्या करूण नायर आणि ऋतुराज गायकवाडने देखील शतक ठोकलं आहे. त्यात अजूनही रणजीच्या या हंगामात आणखी सामने खेळवणे बाकी आहे.त्यामुळे आता या खेळाडूंमध्ये पुन्हा कुणाचं नाव अव्वल स्थानी येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ranji Trophy : अर्जुनच्या 359 धावा,पृथ्वीचीही बॅट तळपली, रणजीत सर्वाधिक धावा करणारे सहा बॅटसमन कोण?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement