Rohit sharma : आर आश्विनची रोहितबद्दलची भविष्यवाणी ठरली खरी! Whats App चॅट लीक, पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ashwin Predicted Rohit century : अॅश की बात या कार्यक्रमातील एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात आर आश्विनने सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे.
Ravi Ashwin On Rohit sharma : सिडनी येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात, भारताचा 'हिटमॅन' रोहित शर्मा याने शानदार शतकी पारी केली. रोहित शर्माने 121 धावांची नाबाद इनिंग खेळत भारताला 9 विकेट्सने विजय मिळवून दिला आणि 3 मॅचची सिरीज 1-2 अशी संपवली. यावेळी रोहित शर्माचे वनडे क्रिकेटमधील 33 वं शतक ठोकलं. रोहित शर्माने आपल्या 125 बॉलच्या खेळात 13 चौकार आणि 3 सिक्स मारले. अशातच आता आर आश्विनचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. आर आश्विनची भविष्यवाणी खरी ठरली.
आश्विनची भविष्यवाणी खरी ठरली
आर आश्विनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आता समालोचन करताना दिसतो. अशातच अॅश की बात या कार्यक्रमातील एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात आर आश्विनने सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. आर आश्विनने विराट कोहलीच्या फिफ्टीआधीच सांगितलं होतं की रोहित शर्मा आज शतक मारणार आणि आर आश्विनचे शब्द खरे ठरले. याची चॅट देखील या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली.
advertisement
काय म्हणाला आर आश्विन?
रोहित शर्माची बॅटिंग सर्वांना माहिती आहे. तो मोठे शॉट्स खेळतो. पिकअप आणि पूल शॉट चांगले मारतो. रोहित शर्मा नेहमी दोन रन पळतो. पण रोहित शर्मा फिट आणि चांगल्या बॅटिंग टचमध्ये दिसत होता. त्याच्यासाठी धावा निघणं महत्त्वाचं होतं. आज गिलसोबत जेव्हा तो पळत होता, तेव्हा तो तीन धावा पळण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा युवा असलेल्या गिलने पळण्यास नकार दिला. त्यावरून त्याचा माईंटसेट काय आहे हे कळतं, असं आर आश्विन म्हणाला.
advertisement
Ashwin Predicted Rohit's 100 pic.twitter.com/i1KBJmuiAp
— the dudeness (@andhraabbay) October 25, 2025
प्लेअर ऑफ द सिरीज
दरम्यान, रोहित शर्माने आपल्या 125 बॉलच्या खेळात 13 चौकार आणि 3 सिक्स मारले. रोहित शर्माला या उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' आणि 'प्लेअर ऑफ द सिरीज' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विराट कोहलीनेही त्याला चांगली साथ देत 74 धावांची नाबाद अर्धशतकी पारी केली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 26, 2025 7:56 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit sharma : आर आश्विनची रोहितबद्दलची भविष्यवाणी ठरली खरी! Whats App चॅट लीक, पाहा Video


