IPL 2026: 'मला रिलीज करा...'; CSKच्या दिग्गज खेळाडूची संघाला विनंती, टीममध्ये होणार मोठा बदल
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
IPL 2026 CSK: आयपीएल 2026पूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन यांनी संघातून रिलीज होण्याची विनंती केली आहे.
मुंबई: आयपीएल 2026चा हंगाम सुरू होण्यास अद्याप बराच मोठा कालावधी आहे. मात्र संघांची तयारी मात्र वर्षभर सुरू असते. गेल्या आयपीएलमध्ये अतिशय खराब कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघातून आता एक मोठी बातमी समोर येत आहे. सीएसके संघातील अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन यांनी आयपीएल 2026 हंगामाच्या अगोदर संघ व्यवस्थापनाला रिलीज करण्याची विनंती केली आहे. या घडामोडीनंतर आयपीएल 2026च्या लिलावात अश्विन कोणत्या संघाकडून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अश्विनला चेन्नई संघाकडून का खेळायचे नाही याबद्दल काही समजू शकले नाही. मात्र त्याच्या या निर्णयामुळे हे निश्चित झाले आहे ती अश्विन पुन्हा एकदा लिलावात सहभागी होणार आहे. गेल्या वर्षी चेन्नईने अश्विनला 9.25 कोटी रुपयांच्या बोलीवर संघात घेतले होते. तो तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकदा चेन्नईच्या संघात परतला होता. अर्थात 2025च्या हंगामात चेन्नई संघाप्रमाणेच अश्विनला देखील फार खास कामगिरी करून दाखवता आली नव्हती.
advertisement
2025च्या हंगामात अश्विनने चेन्नईकडून नऊ सामने खेळले ज्यात त्याला फक्त 7 विकेट घेता आल्या. अश्विनने 186 चेंडूत 283 धावा दिल्या. तर फलंदाजीत देखील त्याला फक्त 33 धावा करता आल्या होत्या.
🚨 ASHWIN REQUESTS RELEASE FROM CSK 🚨
Exclusive: Sources confirm that Ashwin has requested CSK to release him ahead of IPL 2026. 🟡 pic.twitter.com/YQM8UYdeTP
— Johns. (@CricCrazyJohns) August 8, 2025
advertisement
संजू सॅमसनमुळे चेन्नई सुपर किंग्जचा संघ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. राजस्थान रॉयल्स (RR) संघाने त्यांच्या प्रमुख सलामीवीर आणि विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनला रिलीज करण्याचा निर्णय घेतला, तर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघ त्यांना साइन करण्यासाठी प्रबळ दावेदार ठरू शकतो. अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्ज रविचंद्रन अश्विनला राजस्थान रॉयल्समध्ये ट्रेड करण्याचा विचार करू शकतो अशी चर्चा सुरू होती. कारण अश्विन या पूर्वी राजस्थानसाठी खेळलेला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 08, 2025 3:17 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026: 'मला रिलीज करा...'; CSKच्या दिग्गज खेळाडूची संघाला विनंती, टीममध्ये होणार मोठा बदल


