Ruturaj Gaikwad: ऋतुराजने धोनीला बोलण्याचे धाडस दाखवले पाहिजे; CSKच्या माजी खेळाडूने दिला घरचा आहेर
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Ambati Rayudu On MS Dhoni: अंबाती रायुडूने CSKचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला सल्ला दिला की, धोनीला वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सांगावे, कारण धोनी अद्याप शानदार फॉर्ममध्ये आहे आणि संघासाठी मॅच फिनिश करण्याची क्षमता आहे.
गुवाहाटी: आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) या सामन्यात महेंद्रसिंग धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. त्यानंतर चाहत्यांसह अनेकांनी त्याला ट्रोल केले. आता माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडूने या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.
रायुडूने ऋतुराज गायकवाडला सल्ला दिला आहे की, त्याने थोडी हिम्मत दाखवून धोनींना विचारायला हवे की,‘तू वरच्या क्रमांकावर फलंदाजी कराल का?’ कारण धोनी अद्यापही शानदार फॉर्ममध्ये आहे आणि संघासाठी मॅच फिनिश करण्याची त्याची क्षमता अफाट आहे.
धोनीने नवव्या क्रमांकावर येणे योग्य होते का?
CSK आणि RCB यांच्यातील सामन्यात धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. धोनी जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा मॅच चेन्नईच्या हातातून गेली होती. धोनीने त्या सामन्यात काही मोठे शॉट खेळले होते. तरीही त्याला एवढ्या खालच्या क्रमांकावर पाठवणे हे चाहत्यांना आणि क्रिकेट तज्ज्ञांना फारसे पटले नाही.
advertisement
रायुडूने दिला हा मोठा सल्ला
अंबाती रायुडूच्या मते, धोनीच्या फलंदाजीवर संयम ठेवणे संघासाठी चुकीचे ठरू शकते. त्याने गायकवाडला सल्ला दिला की, "कर्णधार म्हणून ऋतुराजने धोनींना सांगायला हवे की, कृपया वरच्या क्रमांकावर फलंदाजी करा, त्याचा संघाला मोठा फायदा होईल.
लाडक्या मुलीच्या शिक्षणासाठी किती fees भरतो धोनी? प्रसिद्ध शाळेत जाते झिवा
आयपीएल 2025मध्ये धोनीने पहिल्या दोन सामन्यात विकेटच्या मागे धमाकेदार कामगिरी केली होती. पहिल्या सामन्यात तो फलंदाजीला आला आणि दोन चेंडू खेळले पण धावा केल्या नाहीत. तेव्हा देखील धोनी फलंदाजीला यावा म्हणून जडेजा बाद झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्धच्या लढती जेव्हा आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले तेव्हा धोनी थोड्या वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येईल असे वाटले होते. पण वरचा क्रमांक सोडा धोनी नेहमी ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो त्या क्रमांकावर देखील आला नाही. आर अश्विन बाद झाल्यानंतर धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्यावरून त्याला ट्रोल करण्यात आले होते.
advertisement
विशेष म्हणजे धोनी आणि चेन्नई संघाबद्दल बोलण्याची रायडूची ही पहिली वेळ नाही. याआधी धोनी फलंदाजीला यावे म्हणून आपल्याच संघातील फलंदाज बाद व्हावा अशी मागणी चाहते करत असतात. इतकच नाही तर फलंदाज बाद झाल्यानंतर चाहते आनंद व्यक्त करतात कारण धोनी फलंदाजीला येणार असतो, ही गोष्ट क्रिकेटसाठी चांगली नाही असे रायडू म्हणाला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 30, 2025 7:35 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ruturaj Gaikwad: ऋतुराजने धोनीला बोलण्याचे धाडस दाखवले पाहिजे; CSKच्या माजी खेळाडूने दिला घरचा आहेर