चॅम्पियन बनताच RCB ची टीम विकायला काढली, देशाला लस देणारा होणार विराटच्या टीमचा नवा मालक!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आरसीबीने 18 वर्षांनंतर पहिल्यांदाच आयपीएलचं विजेतेपद जिंकलं, त्यानंतर आता अनेक स्टार खेळाडूंनी भरलेली आरसीबीची टीम विकली जाणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.
बंगळुरू : आरसीबीने 18 वर्षांनंतर पहिल्यांदाच आयपीएलचं विजेतेपद जिंकलं, त्यानंतर आता अनेक स्टार खेळाडूंनी भरलेली आरसीबीची टीम विकली जाणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. आरसीबीची सध्याची मालकी डियाजियोकडे असून त्यांनी टीम विक्री करण्याची तयारी सुरू केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या अदार पूनावाला यांच्यासह अनेक प्रमुख नावे आरसीबीची टीम विकत घ्यायच्या रेसमध्ये असल्याची चर्चा आहे.
2 अब्ज डॉलरचा करार
मीडिया रिपोर्टनुसार डियाजिओ सुमारे आरसीबीच्या विक्रीसाठी 2 अब्ज डॉलर्सच्या कराराचा विचार करत आहे, ज्यात टीम विकत घेणाऱ्यांना लंपसम म्हणजेच एकरकमी देयक आणि सेकंडरी डीलमुळे फायदा होऊ शकतो. डियाजियोने मात्र या बातम्यांवर स्पष्ट प्रतिसाद दिलेला नाही. आपण बाजारातील अनुमानांवर भाष्य करत नसल्याचं कंपनीने सीएनबीसी-टीव्ही18 सोबत बोलताना सांगितलं. तसंच अदार पूनवाला यांच्याकडूनही याबद्दलची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
advertisement
डियाजियो इंडियाचे एमडी आणि सीईओ प्रवीण सोमेश्वर यांना सीएनबीसी-टीव्ही18 वर संभाव्य विक्रीबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला होता. 'आरसीबी हा रोमांचक व्यवसाय आहे, पण तो डियाजियोसाठी मुख्य व्यवसाय नाही', असं वक्तव्य सोमेश्वर यांनी केलं होतं.
आरसीबीने 2025 मध्ये वाईट आणि चांगला काळही पाहिला. आरसीबीने यंदाच्या मोसमात ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. 18 वर्षांनंतर आरसीबीने पहिल्यांदाच आयपीएलचं जेतेपद पटकावलं, पण विजयाचा हा आनंद त्यांना फार काळ घेता आला नाही. विजयानंतर आरसीबीने बंगळुरूमध्ये समारंभाचं आयोजन केलं होतं, पण या समारंभात चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे 11 जणांचा मृत्यू झाला.
advertisement
आरसीबीचे माजी प्रमुख ललित मोदी यांनी काही दिवसांपूर्वी आरसीबीच्या विक्रीचे संकेत दिले होते. 2025 च्या चॅम्पियन टीमला आता नवीन मालक मिळेल, असं ललित मोदी म्हणाले होते. तेव्हापासूनच आरसीबीच्या विक्रीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 30, 2025 9:38 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
चॅम्पियन बनताच RCB ची टीम विकायला काढली, देशाला लस देणारा होणार विराटच्या टीमचा नवा मालक!