RCB vs PBKS Final : कुणाच्याच लक्षात आलं नाही अन् खरी मॅच इथं फिरली, 17 व्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings : आयपीएल फायनलमध्ये (IPL 2025 Final) कृणाल पांड्या नाही तर आरसीबीची 17 वी ओव्हर टाकणारा बॉलर गेमचेंजर ठरला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या
IPL 2025 RCB vs PBKS Final : आयपीएल 2025 च्या थरारक अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यातील लढत शेवटच्या क्षणांपर्यंत रंगली होती. शशांक सिंगने पूर्ण ताकद लावली पण पंजाबच्या हातातून सामना निसटला आणि ट्रॉफीही... परंतु, 17 व्या ओव्हरमध्येच पंजाबचा गेम झाला होता. आरसीबी आयपीएल जिंकणार याचा भास मॅच संपण्याच्या 15 मिनिट आधीच सर्वांना आला होता. 17 व्या ओव्हरमध्ये असं काय घडलं? जाणून घ्या...
भुवनेश्वर ठरला गेमचेंजर
आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, पंजाब किंग्स एका क्षणी विजयाच्या जवळ पोहोचल्याचे दिसत होते. पण, जेव्हा 17 वी ओव्हर टाकण्यासाठी भुवनेश्वर कुमार आला, तेव्हा पंजाबला विजयासाठी काही मोठ्या धावांची गरज होती. भुवनेश्वरने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत या ओव्हरमध्ये दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवून पंजाबच्या आशांवर पाणी फिरवलं.
advertisement
RCB फॅन्ससाठी विराट कोहलीची इन्स्टाग्राम पोस्ट, भावुक होत म्हणाला, 'तू 18 वर्ष साथ सोडली नाही पण...'
मार्क्स स्टॉयनिसची विकेट
भुवनेश्वरने आपल्या षटकाच्या सुरुवातीलाच नेहल वढेरा याला बाद केलं. नेहल वढेरा एक आक्रमक फलंदाज होता आणि तो मैदानावर स्थिरावलेला दिसत होता. अशा स्थितीत त्याची विकेट घेणं पंजाबसाठी मोठा धक्का होता. नेहल बाद झाल्यानंतर आलेल्या मार्क्स स्टॉयनिसकडून पंजाबला मोठ्या अपेक्षा होत्या. स्टॉयनिस हा त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि तो एका क्षणात सामन्याचे चित्र बदलू शकतो. परंतु, भुवनेश्वर कुमारने आपल्या कौशल्याचा अप्रतिम नमुना दाखवत स्टॉयनिसलाही झटपट तंबूत पाठवलं.
advertisement
एकाच ओव्हरमध्ये दोन प्रमुख फलंदाज गमावल्यामुळे पंजाब किंग्सचा डाव गडगडला. या दुहेरी धक्क्यामुळे पंजाबवर प्रचंड दबाव आला आणि त्यानंतर त्यांना आवश्यक धावा काढणं कठीण झालं. तर दुसऱ्या बाजूने शशांकवर देखील प्रेशर जाणवत होतं. या दोन विकेट्समुळे RCB ला सामन्यात मजबूत पकड मिळाली आणि त्यानंतर त्यांनी पंजाबला 184 धावांवर रोखून 6 धावांनी विजय मिळवला. भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या या 17 व्या ओव्हरमध्ये या अंतिम सामन्याचा 'गेम चेंजर' (Game Changer) मानलं जात आहे, कारण याच ओव्हरमध्ये RCB च्या 18 वर्षांच्या स्वप्नपूर्तीला निर्णायक कलाटणी दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 04, 2025 10:39 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
RCB vs PBKS Final : कुणाच्याच लक्षात आलं नाही अन् खरी मॅच इथं फिरली, 17 व्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?