हॅपी रिटायरमेंट जड्डू भाई… दुसऱ्या टेस्टपूर्वी Ravindra Jadeja ने घेतली निवृत्ती? Rishabh Pant ने दिल्या शुभेच्छा
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
Ravindra Jadeja-Rishabh Pant : भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये केक कापून टी-२० विश्वचषक विजयाचे एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला. यादरम्यान ऋषभ पंतने अष्टपैलू रवींद्र जडेजाला निवृत्तीबद्दल अभिनंदन करून त्याची खिल्ली उडवली आहे.
1 Year T-20 World Cup Winning Celebration : भारतीय खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये आहेत आणि इंग्लंडमधेच पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. इंग्लंडमध्ये, टीम इंडियाच्या खेळाडूंनी टी-20 विश्वविजेता बनल्याच्या एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केक कापून हा खास दिवस साजरा केला. गेल्या वर्षी 29 जून रोजी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली रोमांचक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने 17 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले. या खास प्रसंगी, संघाचा स्टार ऋषभ पंतने अष्टपैलू रवींद्र जडेजाची खिल्ली उडवली आणि टी-20 मधून निवृत्तीचे एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन केले. त्याने त्याला केक खायला दिला आणि जड्डू भाईला निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.
BCCI ने केला व्हिडिओ शेअर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंडमध्ये चाहत्यांसाठी टी-20 विश्वचषक विजेता होण्याच्या एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये हॉटेल कर्मचारी 'टीम इंडिया' आणि 'चॅम्पियन्स ऑफ टी-20 विश्वचषक 2024' असे लिहिलेले दोन केक घेऊन येत असल्याचे दिसून येते. कर्णधार शुभमन गिलने मोहम्मद सिराजला पुढे बोलावले आणि यशस्वी जयस्वालला बोलावले. केक कापण्यासाठी अर्शदीप सिंगला पुढे आणण्यात आले. शेवटी, सर्वांनी टी-20 विश्वचषक विजयाचा नायक आणि मालिकावीर जसप्रीत बुमराहला केक कापण्यास सांगितले. त्याने हा केक कापला आणि नंतर सर्वांनी तो साजरा केला.
advertisement
In Birmingham, bringing in one-year anniversary of #TeamIndia's T20 World Cup 🏆 Triumph!
Core memory 🥹 pic.twitter.com/FUUjbKdnHN
— BCCI (@BCCI) June 29, 2025
advertisement
ऋषभ पंतने केलं अभिनंदन
या खास प्रसंगासाठी दोन केक आणण्यात आले होते. एकावर टीम इंडिया लिहिलेले होते आणि दुसऱ्यावर चॅम्पियन टी-20 वर्ल्ड कप 2024 लिहिलेले होते. जसप्रीत बुमराहने पहिला केक कापला तर मोहम्मद सिराजने दुसरा केक कापला आणि सर्वांना खायला दिला. खेळाडूंनी एकमेकांना केक खायला दिला आणि ऋषभ पंतने अष्टपैलू रवींद्र जडेजाला टी-20 मधून निवृत्तीचे एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विनोदाने अभिनंदन केले.
advertisement
जडेजाने दिल उत्तर
ऋषभ पंतने जडेजाला चिडवले आणि म्हणाला, "निवृत्तीच्या शुभेच्छा जड्डू भाई." यावर, अष्टपैलू खेळाडूने लगेच उत्तर दिले आणि आठवण करून दिली की त्याने फक्त एकच फॉरमॅट सोडला आहे. म्हणून त्याला आनंदी निवृत्ती म्हणू नका. जडेजा म्हणाला, "भाऊ, मी फक्त एकाच फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. मी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळत आहे."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 30, 2025 1:01 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
हॅपी रिटायरमेंट जड्डू भाई… दुसऱ्या टेस्टपूर्वी Ravindra Jadeja ने घेतली निवृत्ती? Rishabh Pant ने दिल्या शुभेच्छा