Rohit Sharma : भारताच्या पराभवाने चाहते दु:खात बुडाले, ब्रॅड ॲम्बेसेडर बनताच रोहितने दिली गूडन्यूज, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
रोहित शर्माने पुन्हा एकदा फॅन्सना एक गूडन्यूज दिली आहे. त्यामुळे चाहत्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमललं आहे.त्यामुळे रोहित शर्माने नेमकं काय केलं आहे? हे जाणून घेऊयात.
Rohit Sharma ICC Odi Batting Ranking : आयसीसी 2026 टी20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळापत्रकाची आणि ठिकाणांची मंगळवारी 26 नोव्हेंबर 2025 ला घोषणा करण्यात आली होती. या घोषणेसह रोहित शर्माला या टी20 वर्ल्ड कपचा ब्रॅड अँम्बेसेडर देखील बनवण्यात आलं होतं.त्यामुळे फॅन्स प्रचंड खुश होते. पण आज गुवाहाटीच्या मैदानावर भारताच्या पराभवाने फॅन्सची निराशा झाली होती. पण रोहित शर्माने पुन्हा एकदा फॅन्सना एक गूडन्यूज दिली आहे. त्यामुळे चाहत्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमललं आहे.त्यामुळे रोहित शर्माने नेमकं काय केलं आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडिअमवर दुसऱ्या टेस्ट सामन्यात साऊथ आफ्रिकाने 408 धावांनी भारताचा पराभव केला. या विजयासह साऊथ आफ्रिकने 2-0ने ही टेस्ट मालिका जिंकली आहे. विशेष म्हणजे भारताच्या भूमिवर मागच्या 25 वर्षातला दक्षिण आफ्रिकेचा पहिला टेस्ट मालिका विजय होता. या विजयाने भारतीय फॅन्सची मोठी निराशा झाली होती. या निराशेत रोहित शर्मा गूडन्यूज घेऊन आला होता.रोहित शर्मा पुन्हा एकदा जगातला नंबरचा फलंदाज बनला आहे. कारण रोहित शर्माने आयसीसीच्या वनडे बॅटींग रॅकींगमध्ये पुन्हा पहिल्या क्रमांकावर झेप घेतली होती.
advertisement
न्यूझीलंडच्या खेळाडूने टाकलं होत मागे
गेल्या बुधवारी न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डेरी मिचेल याने रोहित शर्माला मागे टाकलं होतं. डेरी मिचेलने 782 गुणांसह अव्वल स्थान गाठलं होतं. डेरी मिचेलने वेस्ट इंडिजविरूद्ध 119 धावांची शतकीय खेळी केली होती. या शतकीय खेळीच्या बळावर त्याने 36 गुण मिळवून 782 गुणांसह रोहित शर्माची वनडे फलंदाजी क्रमावारीतली बादशाहात संपवली होती.
advertisement
रोहित पुन्हा वनडेचा बादशाह
view commentsपण आता आठवड्याभरानंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा वनडेचा बादशाह बनला आहे.कारण त्याने पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठलं आहे. रोहित शर्मा आता 781 गुणांसह वनडे बॅटींग रॅकींगमध्ये अव्वल स्थानी आहे. तर डेरी मिचेल 766 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. रोहित व्यतिरीक्त टॉप 5 मध्ये शुभमन गिल 745 गुणांसह आणि चौथ्या तर विराट कोहली 725 गुणांसह पाचव्या स्थानी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2025 5:37 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : भारताच्या पराभवाने चाहते दु:खात बुडाले, ब्रॅड ॲम्बेसेडर बनताच रोहितने दिली गूडन्यूज, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलं


