Rohit Sharma Retirement : "...त्यानंतर रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय", अखेरचा सामना कधी?

Last Updated:

Dinesh Lad On Rohit Sharma retirement : रोहितचं 2027 साली होणारा वनडे वर्ल्ड कप जिंकण्याचं लक्ष्य असल्याचं दिनेश लाड यांनी कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर सांगितलं होतं.

Dinesh Lad On Rohit Sharma retirement
Dinesh Lad On Rohit Sharma retirement
Rohit Sharma ODI retirement : टीम इंडियाचा माजी वनडे कॅप्टन रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये तिसऱ्या वनडे दरम्यान आपलं 50 वं आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं आणि नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये तो सर्वाधिक रन बनवणारा खेळाडू होता. त्यानंतर आता रोहितवरची टीका बंद झाली आहे. रोहितचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहितच्या निवृत्तीवर मोठं वक्तव्य केलं आहे.

रोहित 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळेल

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना दिनेश लाड म्हणाले, "तिसऱ्या वनडे सामन्यात रोहितने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आणि टीम इंडियाच्या विजयात त्याने ज्याप्रकारे योगदान दिलं त्यामुळे सामना मजेदार झाला. तो 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळेल आणि त्यानंतर निवृत्त होईल." विराटने देखील पर्थ आणि ॲडलेड येथे सलग दोन डक झाल्यानंतर 74 रनची दमदार खेळी केली होती. त्याचं कौतूक देखील लाड यांनी केलं.
advertisement

रोहितचं लक्ष वनडे वर्ल्ड कपकडे

रोहितचं 2027 साली होणारा वनडे वर्ल्ड कप जिंकण्याचं लक्ष्य असल्याचं दिनेश लाड यांनी कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर सांगितलं होतं. रोहित शर्मा याचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये विजयी होण्याचं लक्ष्य होतं. मात्र दुर्देवाने टीम इंडिया क्वालिफाय करण्यात अपयशी ठरली. आता रोहितचं लक्ष वनडे वर्ल्ड कपकडे आहे, असंही दिनेश लाड म्हणाले आहेत.
advertisement

सचिन तेंडुलकरने म्हटलं होतं...

दरम्यान, विराट असा खेळाडू आहे जो कधीही आणि कुठंही चांगली कामगिरी करू शकतो. "त्याने ज्याप्रकारे आज खेळ केला, ते पाहून आनंद झाला. सचिन तेंडुलकरने खूप वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात सांगितलं होतं की, रोहित आणि विराट हे असे खेळाडू असतील जे त्याचे रेकॉर्ड तोडतील. दोघंही त्याच्या रेकॉर्डच्या जवळ येत आहेत, हे ऐकून खरोखर खूप चांगलं वाटतं, असंही दिनेश लाड म्हणाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma Retirement : "...त्यानंतर रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय", अखेरचा सामना कधी?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement