Cheteshwar Pujara Retire : पुजाराचा खेळ कुणालाच कळला नाही, पण सचिनने निवृत्तीनंतर खेळीच गुपित सांगितलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारताचा स्टार क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तब्बल 20 वर्ष क्रिकेटमध्ये आपलं बहुमूल्य योगदान देऊन त्याने क्रिकेटला रामराम ठोकला आहे.
Sachin Tendulkar on Cheteshwar Pujara Retirement : भारताचा स्टार क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तब्बल 20 वर्ष क्रिकेटमध्ये आपलं बहुमूल्य योगदान देऊन त्याने क्रिकेटला रामराम ठोकला आहे.त्यामुळे चेतेश्वर पुजाराच्या या निवृत्तीवर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. आता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली आहे.यावेळी सचिन पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीवर काय म्हणाला आहे? हे जाणून घेऊयात.
सचिन तेंडुलकरने एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर चेतेश्वर पूजाराच्या निवृत्तीवर पोस्ट केली आहे.या पोस्टमध्ये नेमकं तो काय म्हणाला आहे.हे जाणून घेऊयात. पुजारा, तुला तिसऱ्या क्रमांकावर खेळताना पाहून नेहमीच दिलासा मिळाला.तू जेव्हा जेव्हा खेळलास तेव्हा तू शांतता, धैर्य आणि कसोटी क्रिकेटबद्दल गाढ प्रेम घेऊन आलास.दबावाखाली तुझे भक्कम तंत्र, संयम आणि संयम हे संघासाठी आधारस्तंभ राहिले आहेत, या पुजाराच्या खेळीबाबतच्या महत्वाच्या गोष्टी सूरूवातीला सचिन तेंडुलकरने सांगितल्या.
advertisement
Pujara, it was always reassuring to see you walk out at No.3.
You brought calm, courage, and a deep love for Test cricket every time you played.
Your solid technique, patience, and composure under pressure have been a pillar for the team. Out of many, the 2018 series win in… pic.twitter.com/p0mWKfD9zm
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 24, 2025
advertisement
त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये 2018 मध्ये मिळालेला मालिका विजय हा अनेक गोष्टींपैकी वेगळा आहे, तुझ्या अविश्वसनीय लवचिकता आणि सामना जिंकणाऱ्या धावांशिवाय ते शक्य झाले नसते.अद्भुत कारकिर्दीबद्दल अभिनंदन. पुढील अध्यायासाठी शुभेच्छा. दुसऱ्या डावाचा आनंद घे, असा सल्ला देखील सचिनने पुजाराला दिला आहे.
क्रिकेट कारकिर्द
चेतेश्वर पुजारा, ज्याला भारतीय क्रिकेटमध्ये 'द वॉल 2.0' म्हणून ओळखले जाते, तो कसोटी क्रिकेटमधील एक अत्यंत महत्त्वाचा फलंदाज आहे. त्याने आपल्या फलंदाजीच्या शैलीमुळे आणि मोठ्या खेळी खेळण्याच्या क्षमतेमुळे कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचा जन्म 25 जानेवारी 1988 रोजी गुजरात राज्यातील राजकोट येथे झाला. पुजाराने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात देशांतर्गत क्रिकेटमधून केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने प्रचंड रन्स काढले, ज्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागला, परंतु लवकरच त्याने आपली क्षमता सिद्ध केली.
advertisement
पुजाराच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा 2017-18 आणि 2018-19 मधील ऑस्ट्रेलिया दौरा होता. या दौऱ्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना करत, भरपूर रन्स काढले. 2018-19 च्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत त्याने 521 रन्स काढले, ज्यात तीन शतकांचा समावेश होता. त्याच्या या अप्रतिम कामगिरीमुळे भारताने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली. या कामगिरीबद्दल त्याला ‘प्लेयर ऑफ द सीरीज’ म्हणून गौरवण्यात आलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 24, 2025 4:04 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Cheteshwar Pujara Retire : पुजाराचा खेळ कुणालाच कळला नाही, पण सचिनने निवृत्तीनंतर खेळीच गुपित सांगितलं