Shreyas Iyer In ICU : कॅच पडला महागात! श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियात आयसीयूमध्ये दाखल, मेडिकल रिपोर्टमधून काय समोर आलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shreyas Iyer In ICU : टीम इंडियाचा चॅम्पियन बॅट्समन श्रेयस अय्यर याला रिब केजच्या दुखापतीमुळे झालेल्या इंटरनल ब्लीडिंगमुळे सिडनी येथील हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे.
Shreyas Iyer Health Update : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यरने बॅकवर्ड पॉइंटवरून अॅलेक्स कॅरीचा भन्नाट कॅच घेतला. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर दुखापत स्पष्टपणे दिसत होती. त्याच्या डाव्या बरगडीला दुखापत झाली. तो ड्रेसिंग रूममध्ये परतला आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर श्रेयस अय्यर याची कोणतीही माहिती समोर आली नव्हती. अशातच आता ऑस्ट्रेलियातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.
श्रेयस अय्यर ICU मध्ये दाखल
टीम इंडियाचा चॅम्पियन बॅट्समन श्रेयस अय्यर याला रिब केजच्या दुखापतीमुळे झालेल्या इंटरनल ब्लीडिंगमुळे सिडनी येथील हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना क्रिकेट जगतासाठी एक गंभीर बाब आहे. अय्यरवर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्याच्या तब्येतीमधील सुधारणेनुसार, त्याला 2 ते 7 दिवसांपर्यंत ऑब्झर्वेशनखाली (Under Observation) ठेवण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
Indian ODI vice-captain Shreyas Iyer admitted to Sydney hospital due to rib cage injury: BCCI sources
— Press Trust of India (@PTI_News) October 27, 2025
दुखापतीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव
बरगडीच्या दुखापतीमुळे त्याला अंतर्गत रक्तस्त्राव होत आहे. या प्रकारच्या दुखापतीमुळे त्याला उपचारांसाठी जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरच्या प्रकृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तो लवकर बरा होऊन कमबॅक करेल अशी आशा त्याचे चाहते करत आहेत. बीसीसीआय देखील त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे.
advertisement
श्रेयस अय्यरची कामगिरी
दरम्यान, श्रेयस अय्यरची मागील काही मॅचेसमधील परफॉर्मन्स (Performance) खूपच लक्षवेधी राहिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये त्याने टीम इंडियासाठी मध्यक्रमात (Middle Order) दमदार बॅटिंग करत सर्वाधिक 243 रन्स केले. या टूर्नामेंटमध्ये त्याने न्यूझीलंड विरुद्ध 79 आणि पाकिस्तान विरुद्ध 56 रन्सच्या महत्त्वाच्या खेळी केल्या. याव्यतिरिक्त, IPL 2025 मध्ये त्याने पंजाब किंग्सचे (Punjab Kings) कॅप्टन म्हणून उत्कृष्ट काम केले, 17 मॅचेसमध्ये 50.33 च्या सरासरीने 604 रन्स बनवून टीमला फायनलपर्यंत नेलं होतं. त्यामुळे श्रेयस अय्यर टीम इंडियासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 27, 2025 11:59 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shreyas Iyer In ICU : कॅच पडला महागात! श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियात आयसीयूमध्ये दाखल, मेडिकल रिपोर्टमधून काय समोर आलं?


