Suryakumar Yadav Birthday : बर्थडे बॉय सुर्या भारताला देणार 'रिटर्न गिफ्ट', पाकिस्तानला हरवल्यानंतरच कापणार केक!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Suryakumar Yadav Birthday : टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. अशातच सूर्या पाकिस्तानच्या पराभवानंतरच केक कापणार आहे.
India vs Pakistan Asia Cup 2025 : आशिया कप 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील गट-अ मधील महत्त्वाचा सामना 14 सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळला जाईल. या सामन्याबद्दल बऱ्याच काळापासून बरीच चर्चा सुरू आहे, ज्यामध्ये टीम इंडिया देखील पाकिस्तानविरुद्ध खूप मजबूत दिसत आहे. टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळेल. अशातच आज टीम इंडियाच्या कॅप्टनचा वाढदिवस देखील आहे. त्यामुळे हा सामना खास असेल.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियात जागाच मिळवली नाही तर त्याने टीम इंडियाच्या कॅप्टन्सीवर देखील दावा ठोकला. सूर्याला कॅप्टन्सी मिळाल्यानंतर आता तो पाकिस्तानला इंगा दाखवणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघ आज रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर एकमेकांसमोर येतील. हा सामना जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार त्याच्या वाढदिवसाचा केक कापेल.
advertisement
सूर्यकुमार यादवचं टी-ट्वेंटी करियर
सूर्यकुमार यादवने 80 टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय डावांमध्ये 2605 धावा केल्या आहेत ज्यात 4 शतके आणि 21 अर्धशतके आहेत. सूर्याचा टी-ट्वेंटीमध्ये सरासरी 38.31 आहे तर त्याचा स्ट्राइक रेट 167.31 आहे. सूर्यकुमार यादवने 23 टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. सूर्यकुमार यादवच्या नावावर टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अनेक मोठे विक्रम आहेत.
advertisement
सूर्यकुमारच्या नावावर मोठे विक्रम
दरम्यान, त्याने आतापर्यंत चार शतके झळकावली आहेत, ज्यामुळे तो कारकिर्दीत सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय, त्याच्या नावावर 25 अर्धशतकेही आहेत. 2022 मध्ये, त्याने एका कॅलेंडर वर्षात 1164 धावा केल्या, जो या फॉरमॅटच्या इतिहासातील तिसरा सर्वोच्च आकडा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 14, 2025 2:31 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav Birthday : बर्थडे बॉय सुर्या भारताला देणार 'रिटर्न गिफ्ट', पाकिस्तानला हरवल्यानंतरच कापणार केक!