Virender Sehwag चा खळबळजनक खुलासा, 2008 मध्ये 'या' खेळाडूमुळे घेणार होता निवृत्ती; सचिनला कळालं अन्...

Last Updated:

Virender sehwag On MS Dhoni : पद्मजीत सेहरावतच्या पॉडकास्टमध्ये वीरेंद्र सेहवागने मोठा खुलासा केलाय की, तो 2008 मध्येच धोनीमुळे वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होता.

Virender sehwag On Sachin Tendulkar Advice
Virender sehwag On Sachin Tendulkar Advice
Virender sehwag On Sachin Tendulkar Advice : टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने 2011 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाची कामगिरी केली आणि संघाला वर्ल्ड कप जिंकवून देण्यात हातभार लावला होता. वीरेंद्र सेहवागमुळे भारतीय क्रिकेट संघाला वेगळी दिशा मिळाली होती. कसोटीमध्ये आक्रमक क्रिकेटची आयडिया सेहवागमुळे जगभरातील कसोटी क्रिकेटमध्ये रुजली गेली. तर वनडेमध्ये सेहवागने एक नवे विक्रमच रचले होते. अशातच आता वीरेंद्र सेहवागने मोठा गौप्यस्फोट केला आहे.

धोनीमुळे वनडे क्रिकेटमधून निवृत्ती

पद्मजीत सेहरावतच्या पॉडकास्टमध्ये वीरेंद्र सेहवागने मोठा खुलासा केलाय की, तो 2008 मध्येच धोनीमुळे वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होता. पण सचिनने असं काहीतरी सांगितलं अन् सेहवागने निवृत्तीचा राजीनामा खिशात ठेवला. नेमकं काय म्हणाला मुलतानचा सुल्तान? पाहा...

मग खेळून काय उपयोग?

2008 मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात ट्रँग्युल सिरीज सुरू होती. या तिरंगी मालिकेत तीन सामन्यानंतर वीरेंद्र सेहवागला बसवलं गेलं. धोनी त्यावेळी कॅप्टन होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर मला संघात घेतलं गेलं नाही. त्यावेळी मी विचार केला की जर मला एकदिवसीय क्रिकेटमध्ये घेतलं जात नाही, मग खेळून काय उपयोग? प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्यास खेळण्याला काय अर्थ नाही, असं म्हणत मी निवृत्तीचा निर्णय घेतला असं सेहवाग म्हणाला. त्यावेळी मी निराश होऊन तेंडूलकरकडं गेलो.
advertisement

सचिनचा एक सल्ला अन्...

मी सचिन तेंडूलकरकडं गेलो आणि माझी परिस्थिती सांगितली आणि निवृत्तीचा विचार केल्याचं देखील सांगितलं. त्यावेळी सचिनने मला रोखलं आणि थोडा धीर धरण्याचा सल्ला दिला. मी देखील 1999-2000 मध्ये एका अशातच टप्प्यातून गेलो होतो. तेव्हा मला देखील वाटलं की, क्रिकेट साडवं. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो. पण हा काल निघून जाईल. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये, असं तेंडूलकरने मला सल्ला दिला होता, असा खुलासा वीरेंद्र सेहवागने केला आहे.
advertisement

वीरेंद्र सेहवागची वनडे कारकीर्द

वीरेंद्र सेहवागला 'नजफगढचा नवाब' म्हणूनही ओळखले जाते, त्याच्या आक्रमक बॅटिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीत 251 मॅच खेळल्या, ज्यात 8,273 रन केले. त्याची सरासरी 35.05 होती, पण त्याचा स्ट्राइक रेट 104.33 इतका प्रभावी होता, जो त्याच्या जलद खेळाचा पुरावा देतो. सेहवागने वनडेमध्ये 15 शतके आणि 38 अर्धशतके झळकावली. त्याचा सर्वाधिक स्कोर 219 आहे, जो त्याने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध इंदौरमध्ये केला होता. हा स्कोर त्यावेळी वनडे क्रिकेटमधील कोणत्याही बॅट्समनने केलेला सर्वाधिक वैयक्तिक स्कोर होता. बॅटिंगसोबतच त्याने 96 विकेट्स घेऊन बॉलिंगमध्येही महत्त्वाचे योगदान दिले आहे. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्यात बांगलादेशविरुद्ध 175 रनची शानदार इनिंग समाविष्ट आहे. सेहवागने आपल्या कारकिर्दीत 1,132 फोर आणि 136 सिक्स मारले, ज्यामुळे तो क्रिकेट जगतातील सर्वात आक्रमक ओपनरपैकी एक म्हणून ओळखला जातो.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virender Sehwag चा खळबळजनक खुलासा, 2008 मध्ये 'या' खेळाडूमुळे घेणार होता निवृत्ती; सचिनला कळालं अन्...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement