VIDEO : 174 बॉल 252 धावा,एकट्यानेच मॅच फिरवली, 14 सिक्स ठोकणारा विष्णू विनोद कोण?

Last Updated:

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विष्णू विनोद या खेळाडूने तुफान फटकेबाजी केली आहे. या खेळाडूने 84 बॉलमध्ये 162 धावांची नाबाद दीड शतकीय खेळी केली आहे.या खेळीत त्याने 14 सिक्स तर 13 बाऊन्ड्री मारल्या आहेत.

vijay hazare trophy kerala vishnu vinod
vijay hazare trophy kerala vishnu vinod
Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विष्णू विनोद या खेळाडूने तुफान फटकेबाजी केली आहे. या खेळाडूने 84 बॉलमध्ये 162 धावांची नाबाद दीड शतकीय खेळी केली आहे.या खेळीत त्याने 14 सिक्स तर 13 बाऊन्ड्री मारल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 192 इतका होता. विशेष म्हणजे विष्णू विनोदने नुसती दीड शतकीय खेळी नाही तर संघाला विक्रमी बॉलमध्ये सामना जिंकून दिला आहे.त्यामुळे विष्णू विनोदच्या खेळीचा प्रचंड चर्चा रंगली आहे. या खेळीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
खरं तर पदुचेरीने दिलेल्या 247 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केरलाकडून संजू सॅमसन आणि रोहित कुनुमवाल स्वस्तात माघारी परतले होते.त्यानंतर बाबा अपराजीत आणि विष्णु विनोदने केरलाचा डावा सावरला होता. या दरम्यान बाबा अपराजीतने 63 धावांची नाबाद खेळी केली होती. तर विष्णू विनोदने 84 बॉलमध्ये 162 धावांची नाबाद दीड शतकीय खेळी केली होती.या खेळीत त्याने 14 सिक्स तर 13 बाऊन्ड्री मारल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 192 इतका होता.
advertisement
या दोन्ही खेळाड़ूंच्या वादळी खेळीच्या बळावर केरलाने 29 ओव्हरमध्ये म्हणजेच 174 बॉलमध्ये 252 धावा करून हे लक्ष्य गाठत 8 विकेटस राखून हा सामना जिंकला आहे. पदुचेरीकडून भुपेंद्र चव्हाण आणि पार्थ वघानीने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
advertisement
दरम्यान पदुच्चेरी प्रथम फलंदाजी करताना 47.4 ओव्हरमध्ये 247 धावांवर ऑल आऊट झाला होता. पदुच्चेरीकडून अजय रोहेराने 53 धावांची अर्धशतकीय आणि जशवंत श्रीरामने 57 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. केरलाकडून एमडी निधीशने 4, इडेन अॅप्पल टॉम आणि अंकित शर्माने प्रत्येकी 2 विकेट घेतली होती, बिजू नारायण आणि बाबा अपराजिताने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : 174 बॉल 252 धावा,एकट्यानेच मॅच फिरवली, 14 सिक्स ठोकणारा विष्णू विनोद कोण?
Next Article
advertisement
Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement