IPL 2025 फायनलपूर्वी विराट कोहलीची 'अयोध्या वारी', पत्नी अनुष्कासोबत हनुमान गढी मंदिरात दर्शनाला, पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Virat Anushka at Ayodhya : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी अयोध्या येथील हनुमान गढी मंदिराला (Hanuman Garhi temple) भेट दिली. त्यानंतर दोघं राम मंदिरात देखील जाण्याची शक्यता आहे.
Virushka visited Hanuman Garhi temple : गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीची (Virat Kohli) आता अध्यात्माच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. पत्नी अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) विराट अनेकदा अनेक मंदिरांना भेटी देत आहे. टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी गेला होता. अशातच आता विराट कोहली अयोध्याला (Virat Kohli In Ayodhya) पोहोचला आहे. आयपीएलचे महत्त्वाचे सामने सुरू होण्याआधी विराट कोहली अयोध्याला पोहोचल्याने आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
हनुमान गढी मंदिराला भेट
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी अयोध्या येथील हनुमान गढी मंदिराला भेट दिल्याची माहिती समोर येत आहे. हनुमान गढी मंदिर उत्तर प्रदेशातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळ आहे. एकेकाळी 'रन मशीन' म्हणून ओळखला जाणारा विराट, जो प्रत्येक विक्रमाचा पाठलाग करत होता, तो आता मंदिरात शांतपणे पूजा करताना दिसणे हे त्याच्या आयुष्यात एका नवीन टप्प्याचे संकेत देतं, असं काही जणांचं मत आहे.
advertisement
पाहा Video
#WATCH | Uttar Pradesh: Indian Cricketer Virat Kohli, along with his wife and actor Anushka Sharma, visited and offered prayers at Hanuman Garhi temple in Ayodhya. pic.twitter.com/pJAGntObsE
— ANI (@ANI) May 25, 2025
advertisement
यापूर्वी, त्यांना 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्याचे आमंत्रणही मिळाले होते. त्यावेळी सचिनपासून धोनीपर्यंत सर्व खेळाडूंना हजेरी लावली होती. मात्र, विराट कोहली या सोहळ्याला उपस्थित राहू शकला नव्हता. त्यावेळी त्यांच्या उपस्थितीबद्दल काही चर्चा होत्या, परंतु आताच्या वृत्तानुसार, त्यांनी हनुमान गढी मंदिराला भेट दिल्याचं पहायला मिळतंय.
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
May 25, 2025 10:59 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 फायनलपूर्वी विराट कोहलीची 'अयोध्या वारी', पत्नी अनुष्कासोबत हनुमान गढी मंदिरात दर्शनाला, पाहा Video