'माझ्या डोक्यात सतत तेच फिरतंय', RCB चाहत्यांसाठी किंग कोहलीचा भावनिक मेसेज, म्हणाला '4 जून रोजी चुकून...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Virat Kohli on Bengaluru Stampede : बंगळुरूतील चेंगराचेंगरीच्या घटनेला जवळपास तीन महिने उलटल्यानंतर विराट कोहलीने आपली भावना व्यक्त केली आहे.
Virat Kohli on Bengaluru Stampede News : तब्बल 18 वर्षानंतर इंडियन प्रिमियर लीगमध्ये रॉयल चॅलेजर्स बंगळुरूने विजय मिळवला अन् जोरदार विजयी उत्सव साजरा केला होता. मात्र, चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठी चेंगराचेंगरी झाली अन् त्यात 11 चाहत्यांना जीव गमवावा लागला होता. या घटनेवर बोलताना आता विराट कोहलीने आरसीबी (रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु) च्या वेबसाइटवरून एक भावनिक संदेश जारी केला आहे. यामध्ये त्याने 4 जून रोजी झालेल्या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
इतिहासातील सर्वात आनंदाचा क्षण पण...
कोहली म्हणाला, “4 जूनसारख्या घटनेच्या धक्क्यासाठी आयुष्यात कोणतीही गोष्ट तुम्हाला तयार करू शकत नाही. आमच्या फ्रँचायझीच्या इतिहासातील सर्वात आनंदाचा क्षण असावा, पण तो दुर्दैवी घटनेत बदलला.”
जखमी चाहत्यांसाठी प्रार्थना
या घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि जखमी झालेल्या चाहत्यांसाठी आपण प्रार्थना करत असल्याचे कोहलीने सांगितलं. तो पुढे म्हणाला, “तुमची ही हानी आता आमच्या कथेचा एक भाग आहे. एकत्रितपणे, आपण काळजी, आदर आणि जबाबदारीने पुढे जाऊ.”
advertisement
“Nothing in life really prepares you for a heartbreak like June 4th. What should’ve been the happiest moment in our franchise’s history… turned into something tragic. I’ve been thinking of and praying for the families of those we lost… and for our fans who were injured. Your… pic.twitter.com/nsJrKDdKWB
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) September 3, 2025
advertisement
दरम्यान, या संदेशात कोहलीने या घटनेमुळे झालेल्या दुःखावर आणि त्याच्या टीमवर झालेल्या परिणामांवर प्रकाश टाकला आहे. बंगळुरूतील चेंगराचेंगरीच्या घटनेला जवळपास तीन महिने उलटल्यानंतर विराट कोहलीने आपली भावना व्यक्त केली असून, आरसीबी फ्रँचायझीनं त्याचा हा मेसेज आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.
Location :
Bangalore [Bangalore],Bangalore,Karnataka
First Published :
September 03, 2025 12:08 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'माझ्या डोक्यात सतत तेच फिरतंय', RCB चाहत्यांसाठी किंग कोहलीचा भावनिक मेसेज, म्हणाला '4 जून रोजी चुकून...'