Virat Kohli : त्याच्यासाठी तो देवच! पाय धरायला तो चित्यासारखा धावला; बेधुंद अन् बेभान! loop मध्ये पाहात रहाल Video

Last Updated:

Virat Kohli Fan Video : रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर त्याने 52 वं एकदिवसीय शतक पूर्ण केलं, तेव्हा अचानक एक चाहता सुरक्षा रक्षकांना तोडून मैदानात घुसला.

Virat Kohli Fan Video
Virat Kohli Fan Video
Virat Kohli Fan enters field touches feets : भारतात क्रिकेटवेड्या फॅन्सची संख्या कमी नाही. त्यात सुपरस्टार खेळाडूंच्या फॅन्सची संख्या फार मोठी आहे. आपल्या हिरोला भेटण्यासाठी फॅन्स काहीही करू शकतात. अशातच विराट कोहलीचे पाय धरण्यासाठी एका फॅनने आपल्या जीवाची बाजी लावली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साऊथ अफ्रिकेविरुद्ध शतक ठोकताच विराट कोहलीच्या एका चाहत्याने थेट मैदानात एन्ट्री केली.

52 वं एकदिवसीय शतक पूर्ण

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार 135 धावा केल्या. रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर त्याने 52 वं एकदिवसीय शतक पूर्ण केलं, तेव्हा अचानक एक चाहता सुरक्षा रक्षकांना तोडून मैदानात घुसला आणि कोहली त्याचं शतक साजरे करत असताना त्याच्या जवळ आला.
advertisement

विराटला भेटण्यासाठी धडपड

कोहलीने त्याला पायांना स्पर्श करण्यापासून रोखले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लगेचच चाहत्याला बाहेर काढले. ही घटना सुरक्षेतील मोठी चूक मानली जात आहे. पण विराटला भेटण्यासाठी त्याची धडपड पाहताना तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement

10 फूट उंचीवरून मैदानावर उडी

विराटचा चाहता तो विंग ए मधून सामना पाहत होता. सर्वांचे लक्ष कोहलीच्या शतकावर होते आणि या संधीचा फायदा घेत तो सुमारे 10 फूट उंचीवरून मैदानावर उडी मारून थेट कोहलीच्या मैदानात धावला. काय चालले आहे हे कोणालाही समजण्यापूर्वीच तो कोहलीच्या पाया पडला. कोहलीने त्याला उचलले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढले. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याचा व्हिडिओ इंटरनेटवर झपाट्याने व्हायरल झाला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli : त्याच्यासाठी तो देवच! पाय धरायला तो चित्यासारखा धावला; बेधुंद अन् बेभान! loop मध्ये पाहात रहाल Video
Next Article
advertisement
Dharashiv News : 'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिवचं वातावरण तापलं
'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिव
  • 'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिव

  • 'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिव

  • 'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिव

View All
advertisement