ISI गुप्तहेर वसीम अक्रमला भारतामध्ये अटक, बातमी पाहून पाकिस्तानी फास्ट बॉलरची संतप्त रिएक्शन, Video

Last Updated:

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणामध्ये अटक केलेल्या युट्यूबरबाबत पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार वसीम अक्रमने स्पष्टीकरण दिले आहे.

ISI गुप्तहेर वसीम अक्रमला भारतामध्ये अटक, बातमी पाहून पाकिस्तानी फास्ट बॉलरची संतप्त रिएक्शन, Video
ISI गुप्तहेर वसीम अक्रमला भारतामध्ये अटक, बातमी पाहून पाकिस्तानी फास्ट बॉलरची संतप्त रिएक्शन, Video
पलवल : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणामध्ये अटक केलेल्या युट्यूबरबाबत पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार वसीम अक्रमने स्पष्टीकरण दिले आहे. 'वसीम अक्रम नावाच्या एका पाकिस्तानी गुप्तहेराला भारतात अटक करण्यात आली आहे. पण, काही वृत्तवाहिन्या माझा फोटो वापरून दावा करत आहेत की मी तो वसीम अक्रम आहे, परंतु हे खरे नाही', असं वसीम अक्रम म्हणाला आहे. वसीम अक्रमने सोशल मीडियावर याचा व्हिडिओही शेअर केला आहे.
हरियाणातील पलवल येथील रहिवासी युट्यूबर वसीम अक्रम संपूर्ण पाकिस्तानमध्ये ट्रेंड करत आहे. त्याचे नाव वसीम अक्रम असल्याने, माजी पाकिस्तानी कर्णधार वसीम अक्रमच्या फोटोचा वापर करून असंख्य रील्स आणि व्हिडिओ बनवले जात आहेत. या व्हिडिओंमध्ये क्रिकेटर वसीम अक्रमला ट्रोल केले जात आहे.

काय म्हणाला वसीम अक्रम?

'आजकाल लोक सोशल मीडियावर आहेत. मी मोफत सल्ला देत आहे, जो मी कधी देत नाही. पाकिस्तानी असो किंवा इतर कुणीही, प्रत्येकजण सोशल मीडियावर बोलण्यासाठी तयारच बसलेला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक वसीम अक्रम आहेत, किमान एकदा तरी ते तपासा', अशी संतप्त प्रतिक्रिया वसीम अक्रमने दिली आहे.
advertisement
'आपल्या शेजारील देशात एक गुप्तहेर पकडला गेला आहे, त्याचे नाव वसीम अक्रम आहे. न्यूज चॅनेल माझा फोटो पोस्ट करत आहेत. कोण लोक आहेत ही? कुठून आली आहेत? चेक नाही, बॅलन्स नाही, फक्त कमेंट्स करत आहेत. मला काही फरक पडत नाही, हे माझे अकाउंट नाही', असं वक्तव्य वसीम अक्रमने केलं आहे.
advertisement

6 दिवसांपूर्वी पलवलमध्ये गुप्तहेराला अटक

हरियाणातील पलवलमध्ये पोलिसांनी पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) आणि त्यांच्या उच्चायुक्तालयासाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली वसीम अक्रम नावाच्या युट्यूबरला अटक केली. हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अलिमेव गावातील रहिवासी तौफिकची चौकशी केल्यानंतर 26 सप्टेंबर रोजी ही अटक करण्यात आली.
सीआयए पलवलचे प्रभारी पीएसआय दीपक गुलिया यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पलवल जिल्ह्यातील कोट गावातील रहिवासी अक्रम हा युट्यूबर आहे जो युट्यूबवर मेवातच्या इतिहासाचे व्हिडिओ पोस्ट करत होता.
advertisement
तो गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तानी एजंट्सच्या संपर्कात होता आणि त्याने सिम कार्ड पुरवल्याचा आरोप आहे. वसीमचे वडील गावात एक रुग्णालय चालवतात आणि त्यांचे नातेवाईक पाकिस्तानात आहेत. पोलिसांनी अक्रमच्या फोनवरून अनेक गुन्हेगारी व्हॉट्सअॅप चॅट्स जप्त केले आहेत, त्यापैकी काही डिलीट करण्यात आल्या आहेत.

सापळ्यात कसा अडकला वसीम?

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की पलवल पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली तौफिकला अटक केली. तौफिकने अक्रमबद्दल माहिती दिली. 2021 मध्ये शेजारच्या देशात व्हिसासाठी अर्ज करताना अक्रम पाकिस्तानी एजंट दानिशच्या संपर्कात आला. अक्रमच्या कुटुंबाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला असला तरी, चौकशीदरम्यान त्याच्या सीमापार संबंधांकडे लक्ष वेधणारी अनेक तथ्य समोर आले आहेत.
advertisement
2022 पासून पाकिस्तानला संवेदनशील माहिती पाठवल्याचा आरोप असलेल्या तौफिकने चौकशीदरम्यान अक्रमचे नाव उघड केले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अक्रम आणि तौफिक दोघेही इंटरनेट कॉलद्वारे आयएसआय आणि पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या संपर्कात होते. पोलीस अधीक्षक वरुण सिंगला यांनी पलवल गुन्हे शाखा आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे काम सोपवले आहे. गुप्तचर विभागही पोलिसांच्या संपर्कात आहे. येत्या काही दिवसांत आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Wasim Akram (@wasimakramliveofficial)



advertisement

डिलीट चॅट परत मिळवण्याचं आव्हान

पोलीस अधीक्षक वरुण सिंगला यांच्या मते, त्याने पाकिस्तानला पाठवलेल्या संवेदनशील माहितीचा शोध घेण्यासाठी सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून डिलीट केलेले चॅट्स परत मिळवले जात आहेत. वसीम दिल्लीलाही गेला आणि त्याने त्यांना सिम कार्ड दिले. तौफिकला न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे, तर वसीमला चौकशीसाठी चार दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांच्या मते, वसीम एक यूट्यूब चॅनल चालवतो आणि मोकळ्या वेळेत त्याच्या वडिलांना रुग्णालयात मदत करतो. शहर पोलीस ठाण्यात तौफिकविरुद्ध दाखल केलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्यात आता वसीमचे नाव जोडले गेले आहे. दरम्यान, वसीमच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की तो कधीही पाकिस्तानला गेला नाही.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ISI गुप्तहेर वसीम अक्रमला भारतामध्ये अटक, बातमी पाहून पाकिस्तानी फास्ट बॉलरची संतप्त रिएक्शन, Video
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement