Deepti Sharma : टीम इंडियाची 'लेडी DSP', बॅटिंग अन् बॉलिंगमध्येही ऑन ड्युटी, वर्ल्ड कप फायनलपर्यंत एकटी नडली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडियाची स्टार ऑलराऊंडर दीप्ती शर्माने वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करून इतिहासात आपलं नाव कोरलं आहे. वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीप्ती शर्माने 58 रनची खेळी केली.
नवी मुंबई : टीम इंडियाची स्टार ऑलराऊंडर दीप्ती शर्माने वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करून इतिहासात आपलं नाव कोरलं आहे. वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीप्ती शर्माने 58 रनची खेळी केली. याचसोबत दीप्तीच्या वर्ल्ड कपच्या 7 इनिंगमध्ये 215 रन झाल्या आहेत, ज्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. बॅटसोबतच दीप्तीने बॉलनेही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 17 विकेटसह दीप्ती स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरमध्ये संयुक्तपणे आघाडीवर आहे.
दीप्तीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मोठा विक्रम रचला आहे. एका वनडे वर्ल्ड कपमध्ये 200 पेक्षा जास्त रन करणारी आणि 15 विकेट घेणारी दीप्ती शर्मा पहिली खेळाडू ठरली आहे. दीप्तीने श्रीलंकेविरुद्धच्या टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यात 53 रन केल्या होत्या. तर इंग्लंडविरुद्ध तिने आणखी एक अर्धशतक झळकावलं होतं. यानंतर आता फायनलमध्ये दीप्तीने 58 रन करून स्पर्धेतला तिचा सर्वोत्तम स्कोअर केला.
advertisement
ऑफ-स्पिनर असलेल्या दीप्ती शर्माने वर्ल्ड कपमध्ये तीन वेळा इनिंगमध्ये 3 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. दीप्तीने इंग्लंडविरुद्ध 51 रन देऊन 4 विकेट घेतल्या होत्या, ही तिची सर्वोत्तम कामगिरी होती. तसंच तिने श्रीलंकेविरुद्ध 54 रन देऊन 3 विकेट आणि पाकिस्तानविरुद्ध 45 रन देऊन 3 विकेट घेतल्या होत्या.
दीप्तीचं वनडे रेकॉर्ड
advertisement
दीप्तीने 121 वनडेमध्ये 37.01 च्या सरासरीने 2,739 रन केल्या आहेत, ज्यात तिने 18 अर्धशतकं आणि एक शतक केलं आहे. तसंच तिने वनडे क्रिकेटमध्ये 157 विकेट घेतल्या आहेत.
डीएसपी आहे दीप्ती शर्मा
दीप्ती शर्माला याच वर्षी तिच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उत्तर प्रदेश सरकारने पोलीस विभागात डीएसपी म्हणून नियुक्त केलं आहे. मोहम्मद सिराजनंतर डीएसपी बनणारी दीप्ती दुसरी क्रिकेटपटू ठरली आहे. डीएसपी म्हणून नियुक्ती करताना उत्तर प्रदेश पोलिसांनी तिला 3 कोटी रुपये बक्षीसही दिलं. आग्र्यामध्ये जन्मलेल्या दीप्तीची फक्त 12व्या वर्षी उत्तर प्रदेशच्या टीममध्ये निवड झाली, यानंतर 2014 साली दीप्तीची भारतीय टीममध्ये एन्ट्री झाली. दीप्तीने तिच्या करिअरमध्ये टीम इंडियाला अनेक विजय मिळवून दिले आहेत.
view commentsLocation :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
November 02, 2025 10:13 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Deepti Sharma : टीम इंडियाची 'लेडी DSP', बॅटिंग अन् बॉलिंगमध्येही ऑन ड्युटी, वर्ल्ड कप फायनलपर्यंत एकटी नडली!


