Womens World Cup 2025 : इंग्लंडच्या विजयानंतर टीम इंडियाला 'जोर का झटका', Point Table मध्ये मोठा उलटफेर, पाहा टॉपला कोण?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Womens World Cup 2025 Points Table : इंग्लंडच्या टीमकडे देखील 4 अंक आहेत, परंतु इंग्लंडचा नेट रन रेट भारतापेक्षा चांगला आहे.
Women World Cup Points Table : सध्या सुरू असलेल्या आयसीसी वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये मंगळवार 7 ऑक्टोबरला मोठे फेरबदल झाले. भारतीय टीमची नंबर वनची जागा हिसकावली गेली आहे, तर ऑस्ट्रेलियालाही नुकसान सहन करावं लागलं आहे. बांग्लादेशची टीम एक मॅच हरूनही अजून टॉप-4 मध्ये कायम आहे. खालच्या चार टीमवर मात्र कोणताही थेट परिणाम झालेला नाही, कारण जी टीम तिसऱ्या स्थानावर होती, ती थेट पहिल्या स्थानावर गेली, तर पहिल्या स्थानाची टीम दुसऱ्या स्थानावर आणि दुसऱ्या स्थानाची टीम तिसऱ्या स्थानावर घसरली आहे.
भारतीय टीम दुसऱ्या स्थानावर घसरली
मंगळवारी गुवाहाटी येथे बांग्लादेश आणि इंग्लंड वुमेन्स टीम मध्ये वर्ल्ड कप 2025 चा 8वा लीग मॅच खेळला गेला. या मॅचमध्ये इंग्लंडने 4 विकेटने विजय मिळवला आणि या विजयामुळे इंग्लंडची टीम पॉइंट्स टेबलमध्ये थेट नंबर वन टीम बनली आहे. आतापर्यंत 4 अंकांनी टॉपवर असलेली भारतीय टीम दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. कारण इंग्लंडच्या टीमचेही 4 अंक आहेत, परंतु इंग्लंडचा नेट रन रेट भारतापेक्षा चांगला आहे. ऑस्ट्रेलियाची टीम दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरली आहे, त्यांच्या खात्यात 3 अंक आहेत.
advertisement
दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानावर
बांग्लादेशच्या टीमच्या खात्यात 2 अंक आहेत, परंतु दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत त्यांचा नेट रन रेट चांगला आहे. म्हणूनच बांग्लादेश टॉप 4 मध्ये आहे, तर दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानावर आहे. श्रीलंका एका अंकासह सहाव्या स्थानावर आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तानचे खाते अजून उघडलेले नाही.

Womens World Cup 2025 Points Table
advertisement
पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर?
दरम्यान, या दोन्ही टीम्स अनुक्रमे सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत. पाकिस्तानसाठी आजचा सामना खूप कठीण आहे, कारण त्यांना ऑस्ट्रेलियाशी सामना करायचा आहे. या मॅचमध्ये पराभव झाल्यास टीमचे टॉप 4 मध्ये जाण्याचे आव्हान अधिक खडतर होईल. त्यामुळे पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर होण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 8:24 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Womens World Cup 2025 : इंग्लंडच्या विजयानंतर टीम इंडियाला 'जोर का झटका', Point Table मध्ये मोठा उलटफेर, पाहा टॉपला कोण?