WPL Auction : PM मोदींना स्किन केअर रूटीन विचारणाऱ्या खेळाडूला लाखात बोली, कोणत्या संघाने घेतलं ताफ्यात?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी दरम्यान त्यांना स्किन केअर रूटीन विचारणाऱ्या खेळाडूला देखील लाखात बोली लागली आहे.दरम्यान या खेळाडूला कोणत्या संघाने ताफ्यात घेतलं आहे आणि संघाला किती किंमत मोजावी लागली आहे.
WPL 2026 Player Auction : वुमेन्स प्रिमियर लीग 2026 च्या मिनी लिलावाला नवीदिल्लीत सूरूवात झाली आहे. या लिलावात आतापर्यंत अनेक खेळाडूंना बोली लागली आहे.त्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी दरम्यान त्यांना स्किन केअर रूटीन विचारणाऱ्या खेळाडूला देखील लाखात बोली लागली आहे.दरम्यान या खेळाडूला कोणत्या संघाने ताफ्यात घेतलं आहे आणि संघाला किती किंमत मोजावी लागली आहे. हे जाणून घेऊयात.
खरं भारताने वुमेन्स वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर टीम इंडियाच्या महिला टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली होती. या भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंशी एक एक करून चर्चा केली होती. या चर्चे दरम्यान काही खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्नही विचारले होते. टीम इंडियाचा महिला क्रिकेटर हरलीन देओलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची स्किन केअर रूटीन विचारली होती.यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांचे प्रेम हेच तेजस्वी त्वचेची खरी ताकद असल्याने त्यांनी सांगितले होते.
advertisement
दरम्यान हरलीन देओलचा आज मिनी ऑक्शनमध्ये लिलाव पार पडला.या लिलावात युपी वॉरियर्स संघाने हरलीन देओलला 50 लाखाच्या बेस प्राईसवर ताफ्यात घेतलं आहे. त्यामुळे आता हरलीन देओल युपीकडून खेळताना दिसणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2025 5:25 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
WPL Auction : PM मोदींना स्किन केअर रूटीन विचारणाऱ्या खेळाडूला लाखात बोली, कोणत्या संघाने घेतलं ताफ्यात?


