Success Story : मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी पोहोचलेले IAS डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आहेत तरी कोण?

Last Updated:

IAS Dr Shrikrishna Panchal : IAS श्रीकृष्ण पांचाळ हे सध्या जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार पाहत आहेत. 

News18
News18
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरवात केली होती. मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे अशी मागणी जरांगे करत आहेत. जरांगे हे आपले उपोषण सोडणार की सुरू ठेवणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष होतं. मात्र, जरांगे यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व घडामोडीमध्ये सरकारच्या वतीने IAS श्रीकृष्ण पांचाळ हे चर्चेत होते. मग आता हे IAS श्रीकृष्ण पांचाळ कोण आहेत? त्यांची कारकीर्द जाणून घेऊ..
IAS श्रीकृष्ण पांचाळ यांची कारकिर्द
श्रीकृष्ण पांचाळ हे 2016 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. पांचाळ यांनी मुंबईतील ग्रँड वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जेजे हॉस्पिटल मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जे.जे. हॉस्पिटलमध्ये सहा महीने वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. नोकरी करत असतानाच पांचाळ यांनी यूपीएसस्सी ची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मात्र फक्त काही गुण कमी मिळाल्यामुळे त्यांना यश मिळाले नाही. 2014 मध्ये पुन्हा एकदा न खचता जोमाने अभ्यास करत परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मात्र तेव्हा देखील 19 गुण कमी पडल्यामुळे यश मिळालं नाही. नंतर त्यांनी आपल्या झालेल्या चुका सुधारत 2016 साली पुन्हा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांना यश मिळालं.
advertisement
झोपेत असतानाच निकाल लागला 
पांचाळ यांनी निकाल ज्या दिवशी लागला त्या प्रसंगाबद्दल एका मुलाखतीत माहिती दिली होती. ते म्हणाले की, मी झोपेत असतानाच परीक्षेचा निकाल लागला. माझ्या सरांनी मला फोन केला आणि म्हणाले की, काय श्रीकृष्णा अशी कशी रॅंक मिळवलीस असे म्हणत माझी चेष्टा केली. पण मला माहीत होत की परीक्षेत पास होणार आहे म्हणून. नंतर माझ्या सरांनी निकाल सांगितल्यावर दिवसभर माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सुरवातीला निवड यादी पाहिली तेव्हा नाव सापडत नव्हते. मात्र नंतर कृष्णनाथ पांचाळ म्हणून नाव दिसले. आणि तो दूसरा तिसरा कोणी नसून मीच आहे याची खात्री पटली''.
advertisement
दरम्यान, IAS श्रीकृष्ण पांचाळ हे सध्या जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार पाहत आहेत.
view comments
मराठी बातम्या/Success Story/
Success Story : मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी पोहोचलेले IAS डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आहेत तरी कोण?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement