जास्त पॉवरच्या चार्जरने फोन चार्ज केल्याने बॅटरी खराब होते का? काय खरं काय खोटं, लगेच जाणून घ्या

Last Updated:

अनेकांचा चार्जर फास्ट चार्जिंक सपोर्ट करतो. तर काहींचा फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत नाही. अशावेळी अनेकदा लोकांच्या मनात एक प्रश्न नेहमी येतो “जास्त पॉवर असलेल्या चार्जरने फोन चार्ज केल्यास तो खराब होईल का?”

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आजच्या काळात स्मार्टफोन आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. पण जेव्हा अचानक फोनची बॅटरी संपते आणि आपल्याकडे स्वतःचा चार्जर नसतो, तेव्हा आपण दुसऱ्याचा चार्जर वापरतो. अनेकांचा चार्जर फास्ट चार्जिंक सपोर्ट करतो. तर काहींचा फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत नाही. अशावेळी अनेकदा लोकांच्या मनात एक प्रश्न नेहमी येतो “जास्त पॉवर असलेल्या चार्जरने फोन चार्ज केल्यास तो खराब होईल का?”
जास्त पॉवरचा चार्जर वापरणं सुरक्षित आहे का?
जर तुमचा फोन 18W चार्जिंग सपोर्ट करत असेल आणि तुम्ही त्याला 80W किंवा 100W चार्जरने चार्ज करत असाल, तर काळजी करण्यास काहीच कारण नाही. हे पूर्णपणे सुरक्षित आहे. कारण आजकालच्या स्मार्टफोन आणि चार्जरमध्ये Power Negotiation Protocol नावाची एक टेक्नॉलॉजी असते, जी फोनच्या क्षमतेनुसार चार्जिंग नियंत्रित करते.
advertisement
यामुळे फोन जास्त पॉवर घेणार नाही, तर त्याला जितकी गरज आहे तितकीच ऊर्जा मिळेल. उदाहरणार्थ, 18W चार्जिंग क्षमतेचा फोन जर 100W चार्जरने लावला, तरी त्याला केवळ 18W इतकीच पॉवर मिळेल.
ही टेक्नॉलॉजी नेमकी काम कशी करते?
Power Negotiation Protocol चार्जरला फोनची क्षमता सांगतो म्हणजेच फोनला किती वॅट पॉवर लागेल आणि किती पुरवायची आहे. त्यानुसार चार्जर तेवढीच पॉवर फोनकडे पाठवतो. त्यामुळे जास्त वॅटचा चार्जर वापरल्याने फोन ओव्हरलोड होत नाही, आणि बॅटरी सुरक्षित राहते.
advertisement
बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमचीही भूमिका
आजच्या स्मार्टफोन्समध्ये Battery Management System (BMS) देखील असतो. हा सिस्टीम चार्जिंग दरम्यान तापमान, व्होल्टेज आणि करंट नियंत्रित करतो. फोन गरम झाल्यास तो आपोआप चार्जिंग थांबवतो, ज्यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढते आणि नुकसान होण्याची शक्यता कमी होते.
थोडक्यात सांगायचं झालं तर, जास्त वॅटचा चार्जर वापरणं धोकादायक नाही, कारण तुमचा स्मार्टफोन स्वतःच ठरवतो की त्याला किती पॉवर घ्यायची आहे.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
जास्त पॉवरच्या चार्जरने फोन चार्ज केल्याने बॅटरी खराब होते का? काय खरं काय खोटं, लगेच जाणून घ्या
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement