गुन्हेगाराची कुंडली आता एका क्लिकवर, संभाजीनगरच्या 4 विद्यार्थ्यांनी बनवलं खास ॲप

Last Updated:

Tech News: छत्रपती संभाजीनगरमधील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पोलिसांसाठी खास ॲप बनवलं आहे. त्याचा फायदा पोलीस प्रशासनाला होणार आहे.

+
एका

एका क्लिकवर येणार गुन्हेगाराची कुंडली, संभाजीनगरच्या 4 विद्यार्थ्यांनी बनवलं खास ॲप

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : पोलीस विभागाला आता गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. संभाजीनगर शहरातील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी एक ॲप तयार केलेले आहे. या ॲपच्या माध्यमातून सर्व गुन्हेगारांची माहिती पोलिसांना मिळणार आहे. चार विद्यार्थ्यांनी मिळून हे ॲप तयार केलेले असून 'एमओबी सजेशन अॅप्लिकेशन'मुळे पोलीस प्रशासनाला फायदा होणार आहे. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
छत्रपती संभाजी नगर शहरातील देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी ‘एमओबी सजेशन अॅप्लिकेशन’ तयार केले आहे. अथांग वानखेडे, अनुष्का गायकवाड, सृष्टी येळमकर आणि साहिल पाटील अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते या ॲपचे अनावरण करण्यात आले. 15 दिवसांच्या काळात हे ॲप विकसित केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
advertisement
ग्रामीण पोलीस दलाने दिलेली सर्व माहिती या चार विद्यार्थ्यांनी या ॲपमध्ये स्टोअर केली आहे. ही माहिती पोलिसांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये पोलिसांना गुन्हेगाराची गुन्हे करण्याच्या पद्धतीसह, त्याचा संपूर्ण अभिलेख हा आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. पूर्वी गुन्हेगाराची माहिती मॅन्युअल पद्धतीने संकलित करून ठेवण्यात येत होती.
advertisement
एखादा गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्याच्या मोडसनुसार त्या प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती काढण्यात पोलिसांना बराच वेळ जात होता. पोलिसांना गुन्हेगारांची माहिती ही ऑनलाइन पद्धतीने आता एका क्लिकवर काढता येणार आहे. यात रेकॉर्ड, गुन्हा करण्याची पद्धत, त्यांचे फोटो, आरोपींचे महत्त्वपूर्ण कागदपत्रे असणार आहेत. विशेष म्हणजे या आरोपींना पकडण्यासाठी सजेशनसुद्धा ॲप मध्ये दिल्या आहेत, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.
advertisement
ग्रामीण पोलिसांच्या 23 ठाण्यांच्या एका अंमलदारांना अॅक्सेस दिला जाणार आहे. त्यामुळे एसपी ऑफिसला किंवा वरिष्ठ कार्यालयात जाण्याची गरज नसणार आहे. याचे मुख्य अॅक्सेस हे पोलीस अधीक्षकांना असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
गुन्हेगाराची कुंडली आता एका क्लिकवर, संभाजीनगरच्या 4 विद्यार्थ्यांनी बनवलं खास ॲप
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement