Googleचा इतिहासातील सर्वात मोठा अलर्ट; हातातील सर्व कामे बाजूला ठेवा अन् आधी Gmailचा Password अपडेट करा

Last Updated:

Google Warning: गुगलने Gmail वापरकर्त्यांसाठी एक मोठा सुरक्षा इशारा जारी केला आहे. 'ShinyHunters' नावाचा हॅकिंग ग्रुप फिशिंग हल्ल्यांद्वारे 2.5 अब्जाहून अधिक खात्यांना लक्ष्य करत आहे. जगभरातील युझर्सनी सायबर सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

News18
News18
मुंबई: जगातील सर्वात लोकप्रिय आणि आघाडीची मेल सेवा असलेल्या Gmailबाबत एक मोठा धोका निर्माण झाला आहे. Googleने हॅकिंगच्या धोक्यांमुळे एक मोठा इशारा केला आहे. गुगलने 2.5 अब्जाहून अधिक Gmail युझर्ससाठी एक मोठा Security Alert जारी केला आहे. 'ShinyHunters' नावाचा एक हॅकिंग ग्रुप गेल्या काही वर्षांपासून सक्रिय असून, ते फिशिंग (phishing) मोहिमेद्वारे युझर्सच्या डिजिटल खात्यांवर हल्ला करत आहेत. या हल्ल्यांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी गुगलने युझर्सना तातडीने काही उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
शायनीहंटर्स (ShinyHunters) नावाचा हा गट अनेक उच्च-प्रोफाइल डेटा लीक प्रकरणांमध्ये सामील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुगलने युजर्सना सावध राहण्याचे आवाहन केले असून अशा प्रकारचे हल्ले त्यांच्या digital footprintला गंभीर धक्का पोहोचवू शकतात, असा इशाराही दिला आहे.
advertisement
हल्ल्याची पद्धत
हा हॅकिंग ग्रुप अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने हल्ले करतो. त्यांच्या मुख्य हल्ल्याची पद्धत 'फिशिंग' आहे. यात ते युझर्सना असे ईमेल पाठवतात, जे त्यांना तात्काळ काहीतरी कारवाई करण्यास भाग पाडतात. उदाहरणार्थ: 'तुमच्या खात्यात काहीतरी समस्या आहे, त्वरित लॉगिन करून अपडेट करा' किंवा 'तुम्ही बक्षीस जिंकले आहे, या लिंकवर क्लिक करून माहिती द्या'. एकदा युझर्सने त्यांच्या जाळ्यात अडकून दिलेल्या लिंकवर क्लिक केले की हॅकर्सना त्यांच्या सिस्टममध्ये प्रवेश मिळतो.
advertisement
या हल्ल्यांमध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापरही केला जात आहे. हॅकर्स गुगल सपोर्ट एक्झिक्युटिव्हच्या वेशात पीडितांना फोन करतात आणि त्यांचा विश्वास जिंकतात. फोन कॉल झाल्यावर एक फॉलो-अप ईमेल देखील पाठवला जातो. ज्यामुळे लोकांना संशय येत नाही आणि ते सहज बळी पडतात.
advertisement
गुगलने दिलेला सल्ला आणि उपाययोजना
गुगलने या धोक्यांना गांभीर्याने घेत संभाव्य बाधित युझर्सना अलर्ट केले आहे. कंपनीने सर्व युझर्सना त्यांचे डिजिटल अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने काही उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे:
पासवर्ड त्वरित बदला: युझर्सना त्यांचे Gmail पासवर्ड त्वरित बदलून अधिक मजबूत आणि अनोळखी पासवर्ड वापरावेत.
advertisement
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) चा वापर: ही सर्वात प्रभावी सुरक्षा पद्धत आहे. यात पासवर्ड असूनही तुमच्या खात्यात लॉग-इन करण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर येणाऱ्या वन-टाइम पासकोडची (OTP) आवश्यकता असते. यामुळे हॅकर्सना तुमचा पासवर्ड जरी मिळाला तरी ते तुमच्या खात्यात प्रवेश करू शकणार नाहीत.
advertisement
सतर्क रहा: कोणत्याही संशयास्पद ईमेल, लिंक किंवा अटॅचमेंटवर क्लिक करू नका. अनोळखी स्त्रोतांकडून आलेले ईमेल उघडताना विशेष काळजी घ्या.
डिजिटल सुरक्षितता: गुगलने स्पष्ट केले आहे की- हे हल्ले केवळ तुमच्या Gmail खात्यापुरते मर्यादित नाहीत. हॅकर्स तुमच्या Gmail खात्यावर नियंत्रण मिळवून बँक, ऑनलाइन शॉपिंग आणि इतर महत्त्वाच्या सेवांवरील तुमच्या डिजिटल ओळखीचा गैरवापर करू शकतात.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Googleचा इतिहासातील सर्वात मोठा अलर्ट; हातातील सर्व कामे बाजूला ठेवा अन् आधी Gmailचा Password अपडेट करा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement