Jio यूझर्ससाठी गुड न्यूज! 49 रुपयांमध्ये यूझर्सला मिळेल अनलिमिटेड डेटा

Last Updated:

Reliance Jio कडेही असा स्वस्त प्लॅन आहे. जो तुम्हाला 50 रुपयांपेक्षा कमीमध्ये अनलिमिटेड डेटाचा लाभ देईल. जिओचा हा प्लॅन एअरटेल आणि Vi या दोहोंना टक्कर देईल. जिओच्या 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळतील? चला जाणून घेऊया.

जियो रिचार्ज
जियो रिचार्ज
मुंबई : दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे जो एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया उर्फ ​​व्हीशी स्पर्धा करतो. Jio च्या या स्वस्त प्लॅनची ​​किंमत फक्त 49 रुपये आहे. तुम्हाला या प्लॅनचे काय फायदे होतील आणि हा प्लॅनची किती दिवसांची व्हॅलिडिटी आहे? चला जाणून घेऊया.

Jio 49 Plan Details

रिलायन्स जिओच्या 49 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला कंपनीकडून 1 दिवसाची व्हॅलिडिटी मिळेल. डेटाबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीच्या ऑफिशियल साइटनुसार, हा प्लॅन अनलिमिटेड डेटासह येतो. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्हाला हा प्लॅन 25 GB च्या FUP लिमिटसह मिळेल.
advertisement
एअरटेलच्या 49 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 1 दिवसाची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड डेटाचा लाभ दिला जात आहे. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीवरून असे समोर आले आहे की, अमर्यादित डेटासह येणारा हा प्लॅन 20 जीबीच्या FUP लिमिटसह येतो.

Vi 49 Plan Details

Vodafone Idea चा 49 रुपयांचा रिचार्ज प्लॅन देखील आहे. तुम्हाला हा प्लॅन सुद्धा एक दिवसाच्या व्हॅलिडिटी मिळेल पण या प्लॅनमध्ये फक्त 20 GB हाय स्पीड डेटा दिला जात आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की Airtel, Vodafone Idea आणि Reliance Jio या तिन्ही कंपन्यांचे हे रिचार्ज प्लॅन डेटा पॅक आहेत.
advertisement
Jio चा मोठा धमाका! 5.5G झालं लॉन्च, आता मिळेल 1Gbps ची सुपरफास्ट इंटरनेट स्पीड
डेटा पॅकमुळे, 49 रुपयांच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड मोफत कॉलिंग किंवा एसएमएसचा लाभ मिळत नाही. जरी Jio, Airtel आणि Vodafone Idea चे इतर अनेक डेटा प्लॅन आहेत जे कमी किमतीत उपलब्ध आहेत, पण 49 रुपयांचा प्लॅन काही खास आहे. कारण एवढ्या कमी किमतीत कोणतीही कंपनी अनलिमिटेड डेटाचा लाभ देत नाही.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Jio यूझर्ससाठी गुड न्यूज! 49 रुपयांमध्ये यूझर्सला मिळेल अनलिमिटेड डेटा
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement