Jio यूझर्ससाठी महत्त्वाची सूचना! या नंबरवरुन कॉल आल्यास करु नका कॉल बॅक, होईल फसवणूक

Last Updated:

Jio premium rate service scam: या फसवणुकीत आंतरराष्ट्रीय नंबरवरुन मिस्ड कॉल येतात. तुम्ही या नंबरवर परत कॉल केल्यास,तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. जाणून घेऊया काय आहे का घोटाळा...

जिओ प्लॅन्स
जिओ प्लॅन्स
मुंबई : रिलायन्स जिओने एक ॲडव्हायजरी जारी केली आहे. ज्यात त्यांनी मोबाईल यूझर्सना एका नवीन प्रकारच्या फसवणुकीबद्दल सतर्क केले आहे. या फसवणुकीत आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून मिस्ड कॉल येतात. तुम्ही या नंबरवर परत कॉल केल्यास, तुमच्या फोनचे बिल जास्त आकारले जाऊ शकते. त्यामुळे हा घोटाळा टाळण्याची गरज आहे. जाणून घेऊया काय आहे हा घोटाळा आणि तो कसा काम करतो….
premium rate service scam काय आहे?
प्रीमियम रेट सर्व्हिस स्कॅममध्ये यूझर्सना अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबरवरून मिस्ड कॉल येतात. यूझर्सने या नंबरवर परत कॉल केल्यास, तो प्रीमियम रेट सर्व्हिसशी जोडला जातो. या सेवेवर कॉल करण्यासाठी प्रति मिनिट खूप जास्त शुल्क आकारले जाते.
advertisement
हा घोटाळा कसा चालतो?
या फसवणुकीत तुम्हाला अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबरवरून मिस्ड कॉल्स येतात. जेव्हा तुम्ही या नंबरवर परत कॉल करता, तेव्हा तुम्ही अशा सर्व्हिसशी जोडलेले असता जी कॉलिंगसाठी खूप शुल्क आकारते.
हा घोटाळा कसा ओळखायचा?
या फसवणुकीत, ज्या नंबरवरुन मिस्ड कॉल येतात त्यांचे देश कोड तुम्हाला ओळखीचे नसतात. स्कॅमर अनेकदा तुम्ही ओळखू शकणार नाही असे देश कोड वापरतात, ज्यामुळे कॉल खरा वाटू शकतो आणि तुम्ही या नंबरवर कॉल बॅक करु शकता.
advertisement
सुरक्षित कसे राहायचे?
जोपर्यंत तुम्ही कॉलरला ओळखत नाही तोपर्यंत '+91' व्यतिरिक्त देश कोड असलेल्या नंबरवर कॉल बॅक करणे टाळा. संशयास्पद आंतरराष्ट्रीय नंबरवरून वारंवार येणारे कॉल थांबवण्यासाठी तुमच्या फोनवरील ब्लॉकिंग ऑप्शन वापरा. स्थानिक असो किंवा आंतरराष्ट्रीय असो, अज्ञात स्त्रोतांकडून आलेल्या कॉलला उत्तर देऊ नका किंवा परत कॉल करू नका. तुमच्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि सहकाऱ्यांना या फसवणुकीबद्दल सांगा जेणेकरून ते पसरण्यापासून रोखता येईल.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Jio यूझर्ससाठी महत्त्वाची सूचना! या नंबरवरुन कॉल आल्यास करु नका कॉल बॅक, होईल फसवणूक
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement