घरात गेल्यावर नेहमी फोनचं network होतं गायब? हे 5 जुगाड देतील 5G सारखी स्पीड!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
स्मार्टफोन आता गरजेची वस्तू बनला आहे. बहुतांश कामं ऑनलाइन करणं शक्य झाल्याने साहजिकच स्मार्टफोनचं महत्त्व वाढलं आहे.
मुंबई: स्मार्टफोन आता गरजेची वस्तू बनला आहे. बहुतांश कामं ऑनलाइन करणं शक्य झाल्याने साहजिकच स्मार्टफोनचं महत्त्व वाढलं आहे. त्यामुळे स्मार्टफोन युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्मार्टफोनसंबंधी एक समस्या आपल्याला कायम जाणवते. घरी गेल्यावर स्मार्टफोनला रेंज येत नसल्याची तक्रार बरेच युझर्स करतात. घरात नेटवर्क पुरेसं येत नसल्याने स्मार्टफोनचा वापर करता येत नाही. तुम्हीदेखील या समस्येचा सामना करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. यातल्या काही टिप्सचा वापर केल्यास स्मार्टफोनच्या नेटवर्कची समस्या दूर होईल.
बऱ्याचदा घरात प्रवेश करताच स्मार्टफोनचं नेटवर्क गायब होतं. अशा स्थितीत कॉल करणं, मेसेज पाठवणं किंवा इंटरनेटचा वापर करणं अवघड जातं. या समस्येमागं अनेक कारणं असू शकतात. घराच्या भिंतींचं बांधकाम करताना काँक्रीट, धातू किंवा मोठ्या विटांचा वापर केला असेल तर त्यामुळे रेडिओ लहरी रोखल्या जातात. त्यामुळे स्मार्टफोनच्या नेटवर्कचे सिग्नल कमकुवत होतात. परिणामी फोनचं नेटवर्क गायब होतं. तुमच्या घराचा परिसर नेटवर्क टॉवरपासून दूर असेल तर कमकुवत सिग्नलमुळे स्मार्टफोनला नेटवर्क मिळत नाही. घरातलं मायक्रोवेव्ह ओव्हन, बेबी मॉनिटर किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणं फोनच्या सिग्नलला अडथळा निर्माण करतात. त्यामुळेदेखील फोनला नेटवर्क मिळत नाही.
advertisement
ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही टिप्सचा वापर करू शकता. प्रयत्न करूनदेखील नेटवर्कमध्ये सुधारणा होत नसेल तर तुम्ही तुमच्या नेटवर्क ऑपरेटरला संपर्क करावा. त्याला तुमच्या परिसरातील नेटवर्कच्या समस्यांची माहिती द्यावी. त्यानंतर तुमची ही समस्या दूर होऊ शकेल. त्याशिवाय सिग्नल बूस्टर हे उपकरण फोनचे सिग्नल सक्षम करते. तुम्ही ऑनलाइन किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक शॉपमधून ते खरेदी करू शकता आणि घरात बसवू शकता. यामुळे नेटवर्क सुधारेल. घरात नेटवर्क मिळत नसेल तर घराच्या दरवाज्यात किंवा खिडकीत जा आणि तिथं फोनला नेटवर्क कसं मिळतंय ते तपासा किंवा घराबाहेर जाऊन नेटवर्क तपासा.
advertisement
नेटवर्कसाठी फोन सेटिंग बदलून पाहा. एअरप्लेन मोड एकदा चालू करून लगेच बंद करा. नेटवर्क सेटिंग्जमध्ये जाऊन मॅन्युअल नेटवर्कची निवड करा. नेटवर्क ऑपरेटर रिसेट करा. यामुळे नेटवर्कची समस्या दूर होऊ शकते. या सर्व गोष्टी करूनदेखील नेटवर्कची समस्या सुटली नाही तर सिम कार्ड बदला. सिम कार्ड खराब झाले असल्यासदेखील नेटवर्कची समस्या जाणवू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 24, 2024 7:30 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
घरात गेल्यावर नेहमी फोनचं network होतं गायब? हे 5 जुगाड देतील 5G सारखी स्पीड!