TRAI च्या आदेशाचा परिणाम! Vi नेही लॉन्च केला विना डेटाचा प्लॅन
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
TRAIच्या नव्या नियमांचा परिणाम दिसू लागला आहे. Airtel आणि Jio नंतर Vodafone-Idea ने देखील डेटाशिवाय दोन स्वस्त रिचार्ज लाँच केले आहेत. व्होडाफोनच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 365 दिवसांपर्यंत व्हॅलिडिटी मिळेल.
मुंबई : TRAI च्या आदेशानुसार, Vodafone Idea ने त्यांचे दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन देखील सादर केले आहेत. ज्यामध्ये यूझर्सना 365 दिवसांपर्यंत व्हॅलिडिटी मिळेल. Jio आणि Airtel प्रमाणेच, Vodafone-Idea ने देखील काही दिवसांपूर्वी त्यांचा व्हाइस ओनली प्लॅन लॉन्च केला होता. जो आता कंपनीने काढून टाकला आहे. त्याऐवजी कंपनीने दोन नवीन प्लॅन लॉन्च केले आहेत. Vodafone-Idea चे हे स्वस्त प्लॅन विशेषत: 2G किंवा फीचर फोन वापरणाऱ्या युजर्ससाठी आहेत. याशिवाय सेकेंडरी सिम असणाऱ्यांसाठीही हे प्लॅन फायदेशीर ठरतील.
Vodafone Idea चा 84 दिवसांचा प्लॅन
Vodafone-Idea ने 470 रुपये किमतीत डेटाशिवाय स्वस्त प्लॅन लॉन्च केले आहेत. या प्लॅनमध्ये युजर्सना 84 दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येत आहे. Voda च्या या प्लॅनमध्ये यूझर्सना भारतभरातील कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. याशिवाय हा प्लॅन फ्री नॅशनल रोमिंगसह येतो. Airtel सारख्या Vodafone-Idea च्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 900 फ्री SMS चा लाभ देखील मिळणार आहे.
advertisement
Vi चा 365 दिवसांचा प्लॅन
Vodafone-Idea ने 84 दिवसांचा तसेच 365 दिवसांचा प्लॅन लॉन्च केला आहे. या व्हॉइस ओनली प्लॅनची किंमत 1,849 रुपये आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यूझर्सना भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह 3,600 फ्री एसएमएसचा लाभ मिळेल. याशिवाय यूजर्सना फ्री नॅशनल रोमिंगचा लाभही दिला जाणार आहे.
advertisement
हा प्लॅन हटवला
view commentsVi ने गेल्या आठवड्यात लाँच केलेल्या 1,460 रुपयांचा व्हॉईस-ओन्ली प्लॅन त्यांच्या वेबसाइटवरून काढून टाकला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 270 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जात होती. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल सांगायचे तर, हा प्लॅन संपूर्ण भारतात मोफत नॅशनल रोमिंग आणि अनलिमिटेड कॉलिंगसह लॉन्च करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 100 फ्री SMSचा लाभ दिला जात होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 27, 2025 2:15 PM IST


