स्मार्टफोनला आता रिमूवेबल बॅटरी का येत नाही? कंपन्यांनी का केला हा बदल? 90 टक्के लोकांना माहित नाही कारण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कंपन्यांनी हा बदल मजबुरीत केला का, की ग्राहकांचाच आग्रह होता? आणि यामुळे वापरकर्त्याला फायदा झाला की नुकसान? चला, आता हे खऱ्या तांत्रिक कारणांसह समजून घेऊया.
मुंबई : आजचा काळ असा आहे की सकाळी डोळे उघडण्याआधी आपण फोन हातात घेतो आणि झोपण्यापूर्वी शेवटचं ज्यावर लक्ष जातं, तोही स्मार्टफोनच. काही वर्षांपूर्वी जे फोन फक्त कॉल आणि मेसेजपुरते वापरले जात होते, तेच आज कॅमेरा, इंटरनेट, पेमेंट, हेल्थ ट्रॅकिंग, एंटरटेनमेंट सगळंच सांभाळतात. जुने नोकिया किंवा बेसिक कीपॅड फोन होते, ज्यांचा मागचा कव्हर काढून आपण सहज बॅटरी बाहेर काढू शकत होतो. पण स्मार्टफोनचं युग आलं, फिचर्स वाढले, डिझाईन बदलले आणि लोकांच्या अपेक्षाही बदलल्या.
आता जवळपास प्रत्येक फोनमध्ये सील्ड बॉडी असते आणि बॅटरी कधीच काढता येत नाही. मग आता अनेकांच्या मनात असा प्रश्न येतो की एकेकाळी सहज काढता येणारी रिमूवेबल बॅटरी अचानक का गायब झाली?
कंपन्यांनी हा बदल मजबुरीत केला का, की ग्राहकांचाच आग्रह होता? आणि यामुळे वापरकर्त्याला फायदा झाला की नुकसान? चला, आता हे खऱ्या तांत्रिक कारणांसह समजून घेऊया.
advertisement
कंपन्यांनी रिमूवेबल बॅटरी का हटवली?
स्मार्टफोनमध्ये बॅटरी हा सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा भाग असतो. आधुनिक बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइटची अतिशय पातळ लेयर असते जी ऊर्जा साठवून ठेवते. ही लेयर फाटली किंवा इलेक्ट्रोड टच झाले, तर बॅटरी गरम होऊ शकते, फुगू शकते किंवा वाईट परिस्थितीत आगही लागू शकते.
जुन्या रिमूवेबल बॅटरीला सुरक्षित ठेवण्यासाठी तिला जाड प्लास्टिक केस लागायचा. त्यामुळे फोन जड आणि जाड दिसत असे, पण लोकांना हलका आणि स्लिम फोन हवा होता, शिवाय स्टायलिश डिझाइन देखील हवं होतं. त्यामुळे कंपन्यांनी उपाय काढला. त्यांनी बॅटरीला थेट फोनच्या बॉडीत सील करून टाकला, त्यामुळे फोन पातळ झाला, सुरक्षित झाला आणि डिझाईनही आधुनिक दिसू लागलं
advertisement
आजच्या बॅटऱ्या जास्त शक्तिशाली झाल्या आहेत, त्यामुळे त्यांना बदलण्याची गरजच उरली नाही. पूर्वीचे फोन साध्या बॅटरीवर चालायचे. लोक बरोबर स्पेयर बॅटरी ठेवायचे, कारण एक संपली की दुसरी लावून काम भागत असे. पण आज एकदा चार्ज केली की फोन तासन्तास चालतो, फास्ट चार्जिंगमुळे 30–60 मिनिटांत फुल चार्ज होते. बॅटरी दिवसात बदलण्याची गरजच उरत नाही आणि सहाजिकच बॅटरी बदलावी लागत नाही त्यामुळे ती रिमूवेबल देण्याचंही कारण नाही.
advertisement
आजचे फोन महाग असतात आणि दोन्ही बाजूंना ग्लास वापरला जातो. फोनला IP67, IP68 सारखी वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ रेटिंग देण्यासाठी फोनची बॉडी पूर्ण सील्ड असणे आवश्यक आहे.
जर बॅटरी काढता येणारी असेल तर, बॅक कव्हर ओपन ठेवावे लागेल, पाणी आणि धूळ आत जाईल, फोन कमकुवत बनेल, सील्ड बॉडीमुळे फोन अधिक मजबूत, टिकाऊ आणि प्रीमियम वाटू लागले. फोन चोरी कमी करण्यासाठीही हा बदल उपयुक्त
advertisement
आजच्या स्मार्टफोन्समध्ये Find My Device सारखी वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे फोन स्विच ऑफ असला तरी लोकेशन ट्रॅक करता येते. पण जर बॅटरी सहज काढता आली असती तर चोराला फक्त 2 सेकंदात बॅटरी बाहेर काढता आली असती. फोन पूर्ण बंद झाला असता आणि ट्रॅकिंगचा उपयोगच राहिला नसता. सील्ड बॅटरी म्हणजे चोरासाठी मोठी अडचण, फोन सहज ऑफ करता येत नाही.
advertisement
रिमूवेबल बॅटरी नाहीशी होण्यामागे फक्त कंपन्यांचा खर्च नव्हता, तर तांत्रिक प्रगती, सुरक्षेची गरज, स्लिम डिझाईनची मागणी आणि यूजर अनुभव यांचा मोठा वाटा आहे. आपण हलका, पातळ, फास्ट-चार्जिंग, वॉटरप्रूफ फोन वापरत आहोत, त्याची किंमत म्हणजे नॉन-रिमूवेबल बॅटरी.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2025 5:58 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
स्मार्टफोनला आता रिमूवेबल बॅटरी का येत नाही? कंपन्यांनी का केला हा बदल? 90 टक्के लोकांना माहित नाही कारण


