Thane : ठाणे परिवहनच्या ताफ्ता दाखल होणार नव्या इलेक्ट्रिक बस,कधीपासून धावणार?तारीख आली समोर

Last Updated:

Thane Transport : ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात 100 नवीन बस दाखल होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील 4 ते 5 बस कोणताही उद्घाटन सोहळा न करता थेट सेवेत येणार असून उर्वरित बस नवीन वर्षात टप्प्याटप्प्याने दाखल होतील.

News18
News18
ठाणे : ठाणे शहरासाठी आनंदाची बातमी आहे. ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात लवकरच पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेअंतर्गत 100 नवीन इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. या योजनेचा पहिला टप्पा गेल्या वर्षभरापासून प्रक्रियेत होता. अखेर आता या बस सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणेकरांना मिळणार आरामदायी प्रवासाचा अनुभव
पहिल्या टप्प्यात एकूण 25 बस येणार असून त्यातील चार ते पाच बस येत्या दहा दिवसांत ठाणे परिवहन सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. उर्वरित बस पुढील काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने ताफ्यात समाविष्ट करण्यात येणार आहेत.
या बस खरेदी प्रक्रियेअंतर्गत काही दिवसांपूर्वी ठाणे परिवहन सेवेच्या अधिकाऱ्यांचे पथक दिल्ली येथे गेले होते. तेथे त्यांनी बसच्या तांत्रिक बाबी, सुरक्षितता, चार्जिंग व्यवस्था आणि इतर सुविधांची सविस्तर पाहणी केली. सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी आढळून आल्या होत्या. मात्र त्या अडचणी दूर करण्यात आल्या असून आता प्रत्यक्ष बस दाखल होण्यास कोणताही अडथळा राहिलेला नाही.
advertisement
या पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेअंतर्गत राज्यातील विविध महानगरपालिका आणि नगरपालिकांना या बस दिल्या जाणार आहेत. यामध्ये नागपूर पालिकेला प्रथम प्राधान्य देण्यात आले होते त्यानंतर ठाणे पालिकेचा क्रमांक होता. मात्र तांत्रिक कारणांमुळे नागपूरमध्येही या बस दाखल होण्यास उशीर झाला. आता ठाणेकरांना लवकरच पर्यावरणपूरक, शांत आणि आधुनिक इलेक्ट्रिक बस सेवेचा लाभ मिळणार आहे
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane : ठाणे परिवहनच्या ताफ्ता दाखल होणार नव्या इलेक्ट्रिक बस,कधीपासून धावणार?तारीख आली समोर
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement