Video: मराठी लोकांची दिवाळी या गाण्याशिवाय साजरी होत नाही, 46 वर्ष जुने गाणे पण आजही सुपरहिट

Last Updated : मनोरंजन
दिवाळीची चाहूल लागली आहे आणि सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण झाले आहे. १९७९ मध्ये अष्टविनायक चित्रपटात अनुराधा पौडवाल यांनी गायलेले आली माझ्या घरी ही दिवाळी हे गाणं खुप लोकप्रिय झाले आहे. आजही हे गाणं सर्वांच्या तोडी असते. आली माझ्या घरी ही दिवाळी सप्तरंगात न्हाऊन आली मंद चांदणे धुंद श्वास हा, मी तर त्यात भिजावे जन्म जन्म रे तुझ्या संगती एकरुप मी व्हावे प्रीत नयनी वसे, लाज गाली हसे कोर चंद्राची खुलते भाळी आली माझ्या घरी ही दिवाळी पाऊल पडता घरी मुकुंदा, गोकुळ हरपून गेले उटी लाविता अंगी देवा, सुगंध बरसत आले हर्ष दाटे उरी, नाथ आले घरी सूर उधळीत आली भूपाळी आली माझ्या घरी ही दिवाळी नक्षत्रांचा साज लेऊनी, रात्र अंगणी आली दीप उजळले नयनी माझ्या ही तर दीपावली संग होता हरी जाहले बावरी मी अभिसारीका ही निराळी आली माझ्या घरी ही दिवाळी
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
Video: मराठी लोकांची दिवाळी या गाण्याशिवाय साजरी होत नाही, 46 वर्ष जुने गाणे पण आजही सुपरहिट
advertisement
advertisement
advertisement