मुंबई : दिवाळी हा पाच दिवसांचा सण म्हणजे आनंद, उजळण आणि शुभकार्यांचा सोहळा. या पाच दिवसांपैकी लक्ष्मीपूजनाचा दिवस हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी घरातील धन, धान्य आणि संपत्तीची पूजा करून श्री लक्ष्मीचे आगमन आणि स्थैर्य मिळवण्याची प्रार्थना केली जाते. परंतु अनेक वेळा आपण कितीही विधिवत पूजा केली तरीही नकळत काही चुका घडतात, ज्या लक्ष्मी आगमनात अडथळा निर्माण करू शकतात. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात, याबद्दल आदित्य जोशी गुरुजींनी लोकल 18 सोबत बोलताना सविस्तर माहिती दिलीये.
यंदा 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे. या काळात ‘शुभ, लाभ आणि अमृत’ हा योग असल्याने याच वेळेत पूजन करणं अत्यंत शुभ मानलं जातं. गुरुजींनी सांगितलं की, “लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी संध्याकाळच्या वेळी शमी, पिंपळ किंवा आवळ्याच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा, यामुळे घरात लक्ष्मीचं वास्तव्य टिकून राहतं.