पुणे: गेल्या काही वर्षांत लिव्ह-इन रिलेशनशिपचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नुकत्याच येरवडा परिसरात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा किरकोळ भांडणातून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणामुळे लिव्ह-इन रिलेशनशिपमधील नात्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची इच्छा यामुळे अनेक तरुण हा पर्याय निवडतात. लग्नाआधी एकत्र राहिल्यामुळे भविष्यात नातं टिकेल का नाही? याचा अंदाज घेण्यासाठी सध्याची पिढी लिव्ह-इन रिलेशनशिपकडे वळत आहे. मात्र काही प्रकरणांमध्ये त्याचे उलट परिणामही दिसून येत आहेत.
Last Updated: December 01, 2025, 16:30 IST