पुणे, : आपल्या घरात शांतता नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपण रात्रंदिवस त्यासाठी प्रयत्न करतो. बऱ्याचदा सर्व सोयीसुविधा असूनही घरात शांतता नसते. लहान मोठ्यांचा आदर करत नाहीत तर मोठ्यांना लहानांच्या गोष्टी समजत नाहीत. प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर भांडणे होतात. कधीकधी मानसिक समस्या देखील उद्भवतात. या अडचणीत कसा मार्ग काढावा यावर पुण्यातील वास्तूतज्ज्ञ कुलदीप जोशी यांनी टिप्स दिल्या आहेत. कशा टाळणार घरातील कटकटी? ‘वास्तू शास्त्रानुसार, ईशान्य दिशा म्हणजे सकारात्मक आणि प्रगतीशील ऊर्जा निर्माण होते. घरातील मंदिरासाठी हे आदर्श स्थान आहे. ईशान्य दिशा भगवान कुबेर नियंत्रित करते. ते भगवान शिवाचं स्थान आहे. घरामध्ये कुठेही ईशान्य कोपऱ्यात अडथळा नसावा. घरामध्ये जर सतत वाद विवाद होत असतील तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात चप्पल स्टॅन्ड , कचऱ्याचा डब्बा ठेवू नये, ईशान्य कोपऱ्यात शौचालयासंबंधी वस्तू ठेवू नये. त्यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रवाह वाढतो आणि संपत्तीचा ऱ्हास होतो,’ असे जोशी यांनी सांगितले
Last Updated: December 03, 2025, 15:36 IST