स्की रिसॉर्टला भीषण आग, 66 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्यासाठी अनेकांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Ski Resort Fire: तुर्कस्तानमधील स्की रिसॉर्टला लागलेल्या आगीत 66 लोकांचा मृत्यू झाला आहे. आग लागली तेव्हा रिसॉर्टमध्ये 200हून अधिक लोक उपस्थित होते.
अंकारा: तुर्कस्तानमधील प्रसिद्ध स्की रिसॉर्टमधील हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत किमान 66 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 3:27 वाजता (स्थानिक वेळेनुसार) बोलू प्रांतातील कर्तलकाया रिसॉर्टमधील एका हॉटेलमध्ये घडली, अशी माहिती मंत्री अली येरलिकाया यांनी दिली. या आगीत किमान 51 जण जखमी झाले असून त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.
या हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत आम्ही 66 लोक गमावले आहेत, असे येरलिकाया यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांना सांगितले. आरोग्यमंत्री केमाल मेमिसोग्लू यांनी सांगितले की, जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे.
या आगीच्या घटनेचे व्हिडिओ सोशळ मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओंमध्ये दिसत आहे की लोक जीव वाचवण्यासाठी खिडक्यांमधून उडी मारण्याचा प्रयत्न करत आहेत. इमारतीच्या वरच्या मजल्यांवर आग लागलेली दिसत आहे. आगीच्या घटनेनंतर इमारतीभोवती काळसर धुराचे लोट दिसत होते.
advertisement
Heartbreaking news from Turkey!
At least 66 lives lost after a massive fire engulfed a popular ski resort in Turkey's Kartalkaya
.
.
.
.
.#Turkiye #Kartalkaya #GrandKartalHotel #WIONUncut #HotelFire #SkiResortDisaster pic.twitter.com/iZDafKQfay
— WION (@WIONews) January 21, 2025
advertisement
स्की रिसॉर्टला अशा वेळी आग लागली आहे जेव्हा तेथे सर्वाधिक गर्दी असते. तुर्कस्तानात जानेवारी ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातील शालेय सुट्ट्या पडतात. या काळात इस्तंबूल आणि अंकारा येथून अनेक लोक बोलू पर्वतावर स्कीइंगसाठी येतात.
A devastating fire at a hotel in Turkey leaves at least 10 dead, with people jumping out of windows in panic
The tragedy occurred at the popular Kartalkaya ski resort in Bolu, Turkey. The fire broke out in the hotel's restaurant.
Reports confirm 10 fatalities, two of whom died… pic.twitter.com/L3SiPKlQjZ
— NEXTA (@nexta_tv) January 21, 2025
advertisement
आपण कधी सुधारणार? नीरज चोप्राच्या पत्नीबद्दल Googleवर पाहा काय सर्च केले
view commentsआग लागली तेव्हा हॉटेलमध्ये 234 लोक होते, असे राज्य-नियंत्रित अनादोलू एजन्सीने बोलूचे राज्यपाल अब्दुलअझीझ आयडिन यांच्या हवाल्याने सांगितले. आग लागल्याचे कळताच काहींनी घाबरून उड्या मारल्यामुळे या घटनेत दोन लोकांचा मृत्यू झाला. तुर्कीच्या टीव्ही चॅनेल्सनी प्रसारित केलेल्या फुटेजमध्ये हॉटेलच्या वरच्या मजल्यांवर आग भडकलेली दिसत होती. काही फुटेजमध्ये लोकांनी बेडशीट्स बांधून आगेतून पळण्याचा प्रयत्न करताना दिसले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 21, 2025 8:12 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
स्की रिसॉर्टला भीषण आग, 66 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्यासाठी अनेकांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या


