PM नेतान्याहूवरून सस्पेन्स संपला, थेट मोदींना फोन करून मानले आभार; सकाळी इराणने केला होता Officeवर हल्ला
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचे सांगत, ज्यू समुदायासोबत ठामपणे उभे राहिल्याबद्दल मोदी यांचे आभार मानले.
तेल अवीव/नवी दिल्ली: इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे “या कठीण काळात आमच्यासोबत ठामपणे उभे राहिल्याबद्दल” आभार मानले आहेत. इराणच्या Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) कडून आज इस्रायलवर करण्यात आलेल्या कथित क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर नेतान्याहू बद्दल सस्पेन्स तयार झाला होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
IRGC ने दावा केला होती की त्यांनी समन्वित क्षेपणास्त्र हल्ल्यात नेतन्याहू यांच्या कार्यालयाला तसेच इस्रायलच्या हवाई दलाच्या कमांडरच्या मुख्यालयाला लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे तेल अवीव आणि आसपासच्या भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र इस्रायली प्रशासनाने हल्ल्यात पंतप्रधान सुरक्षित असल्याचे स्पष्ट करत इराणचा दावा फेटाळला आहे.
नेतन्याहूंची प्रतिक्रिया
पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार भारतासारख्या मित्रदेशाचा पाठिंबा इस्रायलसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद आणि आक्रमणाविरोधातील आमच्या लढ्याला पाठिंबा दर्शवला आहे, असे नेतन्याहू यांनी म्हटले.
advertisement
भारताच्या जनतेसोबत आमची प्रचंड मैत्री आहे. इस्रायलमध्ये भारतीय लोकांचे मोठे कौतुक आणि प्रेम आहे. त्यांनी असा आरोपही केला की हल्लेखोरांनी नागरिकांना लक्ष्य केले आणि डेथ टू अमेरिका, डेथ टू इस्रायल अशी घोषणाबाजी केली. ही दहशतवादी राजवट संपली पाहिजे, असे ते म्हणाले.
सूत्रांच्या माहितीनुसार मोदी यांनी इस्रायलच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत निरपराध नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. भारताने दोन्ही देशांनी संयम बाळगावा आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राजनैतिक मार्गाचा अवलंब करावा, अशी भूमिका मांडल्याचेही सांगितले जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 8:19 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
PM नेतान्याहूवरून सस्पेन्स संपला, थेट मोदींना फोन करून मानले आभार; सकाळी इराणने केला होता Officeवर हल्ला







