काश्मीरला गर्लफ्रेंडसारखं का वागवता? Pakistani News Anchor ची याना मीर यांनी केली बोलती बंद!

Last Updated:

Pakistani News Anchor Viral Video : एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद पेटला असताना आता पाकिस्तानी न्यूज स्टुडिओमध्ये देखील वाद चांगलाच पेटला आहे.

Pakistani News Anchor Viral Video
Pakistani News Anchor Viral Video
Yana mir Fakhar yousafzai Fight : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरचं वातावरण आता आणखी तापलं असून दोन्ही देशांमध्ये आक्रमक हवाई हल्ले सुरू झाले आहेत. अशातच आता पाकिस्तानच्या न्यूज स्टुडिओमध्ये मोठे वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. काही पाकिस्तानी पत्रकारांनी स्वत:च्या देशांना खडे बोल सुनावले आहेत. अशातच आता काश्मीरमधील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या याना मीर यांनी पाकिस्तानी न्यूज अँकरची बोलती बंद केली आहे.

नेमकं काय झालं?

काश्मीर हा मुद्दा तर आहे, असं पाकिस्तानी अँकर म्हणताना दिसतोय. त्यावर जम्मू आणि काश्मीरमधील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या याना मीर यांनी रोखठोक उत्तर दिलं. जगात फक्त काश्मीर हाच एक मोठा मुद्दा होता का? इतर विषय देखील होते पण हा विषय सोडवला का गेला नाही? असा प्रश्न पाकिस्तानचा अँकर फकर युसुफझाई याने विचारला. त्यावर याना मीर यांनी मजेशीर उत्तर दिलं अन् पाकिस्तानी अँकरची बोलती बंद केली.
advertisement

याना मीर यांचं खणखणीत उत्तर

तुम्ही आंतरराष्ट्रीय फोरमवर जाऊन म्हणणार की, ती (काश्मीर) तिच्या नवऱ्यासोबत (भारत) खूश नाहीये. पण जेव्हा ती म्हणत असेल की, मी माझ्या नवऱ्यासोबत खूश आहे. परंतू तुम्ही परत आंतरराष्ट्रीय फोरमवर जाणार आणि म्हणणार की, ती खूश नाहीये, ती माझ्यासोबत असायला हवी. तुम्ही आंतरराष्ट्रीय फोरमवर म्हणार की, तिचं बळजबरीने लग्न करण्यात आलं. त्यानंतर तिचा नवरा काय म्हणेल, हा आहे कोण, आता याची बायको पण मी माझ्यासोबत घेऊन येईल. मधीमधी करणाऱ्या नसलेल्या बॉयफ्रेंडला थांबवायला हवं ना... असं म्हणत याना मीर यांनी खणखणीत उत्तर दिलं.
advertisement

याना मीर कोण आहेत?

याना मीर या श्रीनगर, जम्मू आणि काश्मीरमधील एक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या जम्मू आणि काश्मीरमधील पहिल्या महिला युट्यूबर आहेत आणि त्यांचे यूट्यूब चॅनेल असून २० लाखांहून अधिक सदस्य आहेत. याना मीर यांनी काश्मीरमधील भारतीय पत्रकार याना मीर यांनी काश्मीरवरील भारताच्या भूमिकेचे समर्थन करताना एक जोरदार युक्तिवाद सादर केला.
मराठी बातम्या/विदेश/
काश्मीरला गर्लफ्रेंडसारखं का वागवता? Pakistani News Anchor ची याना मीर यांनी केली बोलती बंद!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement